‘उद्या माझे ड्रायव्हर-मेकअपमन पण अवॉर्ड देतील’ सलमाननं सांगितलं बॉलिवूडचं सत्य

‘उद्या माझे ड्रायव्हर-मेकअपमन पण अवॉर्ड देतील’ सलमाननं सांगितलं बॉलिवूडचं सत्य

सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं या अवॉर्ड फंक्शनवर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्या आलिया भट आणि रणवीर सिंह यांची भूमिका असेलेल्या गली बॉय सिनेमानं 13 अवॉर्ड जिंकत नवा इतिहास रचला. मात्र या अवॉर्ड फंक्शननंतर अनेक कलाकारांमध्ये नाराजीचा सूर दिसला. अनेकांनी हे अवॉर्ड फिक्स्ड असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या अवॉर्ड फंक्शननंतर ट्विटरवर #BoycottFilmfare असा टॅग ट्रेंड करत आहे. याच दरम्यान आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं या अवॉर्ड फंक्शनवर टीका केली आहे.

एक मुलाखातीत सलमान खाननं या अवॉर्ड फंक्शनची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमाननं हे अवॉर्ड फंक्शन म्हणजे मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. सलमान सांगतो अशा शोमध्ये सन्मान घेणं अजिबात मान्य नाही. मी फिल्मफेअर किंवा त्याच्यासारख्या मूर्खपणा असणाऱ्या शोमध्ये अजिबात जाणार नाही. मी असा कोणताही अवॉर्ड घेणार नाही.

लग्नाआधीच कृती सेनन आहे प्रेग्नन्ट? सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा

या व्हिडीओमध्ये सलमान म्हणतो, 3-4 अवॉर्ड फंक्शनच्या ऑर्गनायझर्सकडून मला कॉन्टॅक्ट केलं होतं. पण मी त्यांना सांगितलं की मला असा कोणताही अवॉर्ड घ्यायचा नाही. नॅशनल अवॉर्ड मी नक्की घेईन. पण अशा कोणत्याही मॅगझीनच्या अवॉर्ड फंक्शनला मी जाणार नाही. ज्यांचा बिझनेसच आमच्या बातम्या छापून चालतो. बॉलिवूड स्टार्सच्या मुलाखतींवर त्यांचं मासिक चालतं आणि तेच आम्हाला बोलावून सांगतात आम्ही तुम्हाला अवॉर्ड देत आहोत. तुम्ही आमच्या शोमध्ये परफॉर्म करा.

सलमान पुढे म्हणाला, आम्ही तिथे मूर्खासारखं सूटा-बुटात जाऊन अवॉर्ड घेतो. हे तर मग असं होईल ना की, उद्या उठून माझा ड्रायव्हर, नोकर किंवा मेकअपमन म्हणेल बाबा आज तुम्हाला आम्ही अवॉर्ड देतो. हे अवॉर्ड म्हणजे मूर्खपणा आहे. बॉयकॉट फिल्मफेअर हॅशटॅग ट्रेंड झाल्यानंतर सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक करत आहेत.

भूमि पेडणेकर ते विद्या बालनपर्यंत, डब्बू रत्नानीसाठी अभिनेत्री झाल्या BOLD

अलिया भट आणि रणवीर सिंह यांच्या ‘गली बॉय’ सिनेमाला फिल्मफेअर 2020 मध्ये 13 अवॉर्ड मिळाले. यासोबतच या सिनेमानं काजोल-शाहरुखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चं रेकॉर्ड मोडलं. या सिनेमाच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक अवॉर्ड जिंकण्याचा रेकॉर्ड होता. या सिनेमानं 10 अवॉर्ड जिंकले होते.

TOPLESS फोटोशूट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीला घातले कपडे

First published: February 20, 2020, 9:04 AM IST

ताज्या बातम्या