काळवीट शिकार प्रकरणात दोषी सलमान खानच्या शिक्षेवर 17 जुलैला होणार पुढील सुनावणी

काळवीट शिकार प्रकरणात दोषी सलमान खानच्या शिक्षेवर 17 जुलैला होणार पुढील सुनावणी

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या शिक्षेविरोधात आज जोधपूर कोर्टामध्ये सुनावणी करण्यात आली आहे. सलमान खानच्या शिक्षेविरोधातल्या अर्जावर आता पुढची सुनावणी १७ जुलैला होणार आहे.

  • Share this:

07 मे : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या शिक्षेविरोधात आज जोधपूर कोर्टामध्ये सुनावणी करण्यात आली आहे. सलमान खानच्या शिक्षेविरोधातल्या अर्जावर आता पुढची सुनावणी १७ जुलैला होणार आहे. जोधपूर कोर्टात आज ही सुनावणी करण्यात आली आहे.

दरम्यान, 5 एप्रिल रोजी काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरमधील सीजेएम न्यायालयाने सलमानला कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण या प्रकरणासाठी 5 वर्षाची शिक्षा खुप मोठी असल्याच्या विरोधात सलमानने न्यायालयात धाव घेतली. पण यासंदर्भात पुढील सुनावणी आता 17 जुलैला होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी त्याला 21 दिवस तुरुंगात काढावे लागले होते.

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला दोषी ठरवण्यात आलं होतं. यात त्याला 5 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबरच त्यांनी 10,000 रुपयांचा दंडही लावण्यात आला आहे.

दरम्यान, सलमानला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी त्याला जोधपूर कोर्टाकडून जामीनदेखील मंजूर करण्यात आला होता. सत्र न्यायाधीश रवींद्रकुमार जोशी यांनी 50 हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या दोन जामिनांवर सलमानच्या सुटकेचा आदेश दिला. यानंतर 7 एप्रिलला दुपारीच जामिनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सलमान सायंकाळी तुरुंगातून बाहेर पडला. न्यायालयाने सलमानला जामीन देण्याखेरीज अपिलावर सुनावणी होईपर्यंत, त्याच्या शिक्षेलाही स्थगिती दिली.

या प्रकरणी सहआरोपी असलेले अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2018 09:17 AM IST

ताज्या बातम्या