बर्थडे स्पेशल - ...आणि म्हणून नाही केलं सलमानने लग्न!

बर्थडे स्पेशल - ...आणि म्हणून नाही केलं सलमानने लग्न!

सलमान लग्न कधी करणार?' त्याला अनेकांनी हा प्रश्न विचारला पण तरीही सलमानचं लग्न न करण्याचं गुपितच राहिलं. आज आम्ही हे गुपित तुम्हाला सांगणार आहे.

  • Share this:

27 डिसेंबर : आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या भाईजानचा वाढदिवस आहे. खरं तर सलमान खान म्हटलं की सगळ्यांचा एकच प्रश्न असतो तो म्हणजे, 'सलमान लग्न कधी करणार?' त्याला अनेकांनी हा प्रश्न विचारला पण तरीही सलमानचं लग्न न करण्याचं गुपितच राहिलं. आज आम्ही हे गुपित तुम्हाला सांगणार आहे.

अभिनेत्री रेखानं सलमानच्या लग्न न करण्याचा गुपिताचा खुलासा केला आहे. तर झालं असं की, 'खूप वर्षांआधी, रोज सकाळी रेखा मॉर्निंग वॉकला जायची. त्यावेळेस सलमान 4-5 वर्षांचा होता. रेखा आणि सलमानचं घर जवळच होतं. रेखा मॉर्निंग वॉकला जाताना रोज सलमान तिच्या मागे मागे जायचा. बरं इतकंच नाही तर तो त्याच्या आईला नेहमी म्हणायचा की मी मोठा झालो की लग्न करेन तर रेखाशीच. पण असं काही झालं नाही, त्यामुळेच कदाचित सलमानने अजूनही लग्न केलं नाही.'

बिग बॉसच्या सिझन 8मध्ये रेखाने सलमानच्या लग्नाचा हा गमतीशीर खुलासा केला होता. हो आता सलमान म्हटलं की सगळ्यांसाठी रॉयल हिरो आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. सलमानचा हटके डान्स आणि त्याच्या डायलॉग्सवर अवघी तरुणाई घायाळ आहे.

सलमाबद्दल बोलायचं झालं तर अनेक गोष्टी खास आहेत. पण त्यातली एक गोष्ट म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला दिलेलं हातातलं ब्रेसलेट! जितके सलमानचे चाहते आहेत तितकेच त्याच्या हातातल्या ब्रेसलेटचेही चाहते आहेत. हे ब्रेसलेट गुडलक म्हणून नेहमी सलमानच्या हातात असतं.

सलमान आणि त्याची स्टाईल आपल्या सगळ्यांवर नेहमीच भुरळ पाडते. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला न्यूज 18 लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा!

First published: December 27, 2017, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading