मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Salman Khan Birthday : सलमान खानला व्हायचंय बाप; म्हणाला, मुलं हवी पण मुलांची आई...

Salman Khan Birthday : सलमान खानला व्हायचंय बाप; म्हणाला, मुलं हवी पण मुलांची आई...

सलमान खानला व्हायचं आहे बाप

सलमान खानला व्हायचं आहे बाप

सलमानचं त्याच्या भाचे, पुतण्यांवर प्रचंड प्रेम आहे. पण स्वत:ला मूल हवं का यावर सलमाननं मौन सोडलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 27 डिसेंबर :  बॉलिवूड कलाकार सलमान खानचा स्वॅग अजूनही तरुणींच्या मनावर कायम आहे. इंडस्ट्रीत पदार्पण करणारा हँडसम सलमान असो किंवा सध्याचा फायटर, सिक्स पॅकवाला सलमान असो, तरुणींना सलमानच्या सगळ्या अदांनी भुरळ घातलीय. सलमानचं नावही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय. मात्र सलमानची आणखी एक ओळख आहे. तो लहान मुलांमध्ये खूप रमतो. त्याचं भाचे, पुतण्यांवरचं प्रेम सगळ्यांना माहीत आहे. असं असलं तरी मुलं हवीत, पण मुलांची आई नको अशी त्याची भूमिका आहे. मुंबई मिररला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीवेळी सलमाननं तसं कबूल केलं होतं.

  बॉलिवूडमधला दबंग खान आज 57 वर्ष पूर्ण करतोय. त्या निमित्तानं बहीण अर्पिता खानच्या घरी त्यानं एक पार्टीही ठेवली होती. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकार मंडळींनी पार्टीला हजेरी लावली. किंग खान शाहरूखही पार्टीला आला होता.

  हेही वाचा - सलमानला भेटण्यासाठी Galaxy बाहेर झाली तोबा गर्दी; भाईजान बाहेर आला अन्...; Video तुम्हीच बघा

  सलमान खान आजवर अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिलाय. बॉलिवूड अभिनेत्रींसोबतचं अफेअर, काळवीट शिकार प्रकरण, हिट अँड रन केस ही त्यापैकी काही प्रकरणं. बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलंय. 1991 ते 1999 पर्यंत सोमी अलीसोबत त्याचं अफेअर सुरु होतं. त्यानंतर मॉडेल संगीता बिजलानीसोबतही काही काळ तो प्रेमात होता. त्यांचं लग्नही होणार होतं, मात्र ते झालं नाही. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांच्याशीही सलमान खानचं नाव जोडलं गेलंय. अभिनेत्री ऐश्वर्या रायबाबतच्या अफेअरमुळे सलमान खान त्यावेळी मीडियामध्ये खूप चर्चेत होता. गेल्या काही वर्षात मॉडेल ल्युलिया वँटूर हिच्याशी त्याचं अफेअर सुरु असल्याचं बोललं जातंय. स्वतः सलमान खाननं मात्र त्याबाबत कधीही खुलेपणानं सांगितलं नाही.

  सलमान लहान मुलांमध्ये खूप रमतो. एका जुन्या मुलाखतीमध्ये त्यानं त्याबाबत सांगितलं होतं. भाचे, पुतणे तर त्याला आवडतातच, पण स्वतःची मुलंही आवडली असती, असं त्यानं कबूल केलं होतं. “मला मुलं हवी आहेत, पण मुलांची आई नको. मुलांना आई लागतेच. माझ्याकडे संपूर्ण गाव आहे. मी प्रत्येकाला उज्ज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न करेन,” असं त्यानं मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

  ‘मैने प्यार किया’पासून तरुणींची मनं जिंकणाऱ्या सलमान खानच्या प्रवासाला 30 वर्षांपासून अधिक कालावधी पूर्ण झालाय. बॉलिवूडचा हँडसम, गुडलुकिंग अभिनेता सलमान खान आज (27 डिसेंबर) 58व्या वर्षात पदार्पण करतोय. साजन, हम आपके है कौन, करन-अर्जुन, प्यार किया तो डरना क्या, हम दिल दे चुके सनम, हम साथ साथ है, तेरे नाम, दबंग, एक था टायगर अशा त्याच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं आहे. टीव्हीवरही 10 का दम आणि बिग बॉस सारख्या रिअलिटी शोमुळे सलमान नेहमीच चर्चेत राहिला आहे.

  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News