लॉकडाऊनमध्ये सलमानचा Video Viral, जॅकलीनसोबत बाइक राइड करताना दिसला भाईजान

सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात तो जॅकलीन फर्नांडिससोबत बुलेट राइड करताना दिसत आहे.

सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यात तो जॅकलीन फर्नांडिससोबत बुलेट राइड करताना दिसत आहे.

  • Share this:
    मुंबई, 21 मे : बॉलिवूडचा दबंग सलमान खान खान त्याच्या सिनेमासोबतच डॅशिंग अंदाजासाठी ओळखला जातो. सध्याच्या लॉकडाऊनमध्येही सलमान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. यासोबतच या कठीण काळात लोकांना मदत करण्याची एकही संधी त्यानं सोडलेली नाही. अशात सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सलमान खान जॅकलीन फर्नांडिससोबत बुलेट राइड करताना दिसत आहे. सलमान खानचा हा व्हिडीओ जुना असला तरीही सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओची खूप चर्चा होताना दिसत आहे. यावर भाईजानचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. सलमान आणि जॅकलीनचा हा व्हिडीओ लडाखमधील आहे. ज्यात सलमान खान डोंगरांनी वेढलेल्या रस्त्यांवर बाइक चालवताना दिसत आहे. तर जॅकलीन त्याच्या मागे बसली आहे. याशिवाय या व्हिडीओमध्ये सलमानचे बॉडीगार्ड आणि पोलिससुद्धा दिसत आहेत.
    या व्हिडीओमध्ये लडाखमधील आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकर 'राधे' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सलमानच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये तयार होत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा करत आहे. याआधी सलमानच्या 'दबंग 3' या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा प्रभू देवानंच केलं होतं. सलमानचा 'राधे' खरं तर ईदच्या दिवशी रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसमुळे आता या सिनेमाचं शूटिंग लांबणीवर पडलं आहे. अनुष्काची पहिलीच वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, लॉकडाऊनमध्ये मिळाली लीगल नोटीस एका सिनेमामुळे अनन्या होईल देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, निर्मातीचा दावा
    First published: