Bharat Trailer- हर मुस्कुराते चेहरे के पीछे एक दर्द छिपा होता है.. वो ही दर्द आपको जिंदा रखता है...

सलमान खानचा आगामी भारत सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ३ मिनिट ११ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सिनेमा नक्की काय असणार आहे ते स्पष्ट करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 04:25 PM IST

Bharat Trailer- हर मुस्कुराते चेहरे के पीछे एक दर्द छिपा होता है.. वो ही दर्द आपको जिंदा रखता है...

मुंबई, २२ एप्रिल- सलमान खानचा आगामी भारत सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ३ मिनिट ११ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सिनेमा नक्की काय असणार आहे ते स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून सलमानची गोष्ट सुरू होते. सलमान सर्कसमध्ये ‘मौत का कुआ’त बाइक चालवताना दिसतो. दिशा पटानीही सर्कसमध्ये त्याच्यासोबत काम करताना दाखवण्यात आली आहे. यानंतर तो दुसरी नोकरी करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो. इथे त्याची ओळख कतरिना कैफशी होते. इथे त्याला काम मिळतं. याचदरम्यान एक अशी घटना होते ज्यात सलमान भूतकाळात जातो.

आता काही तरी नवं करणार Akshay Kumar, निवडणूक लढवण्याच्या बातमीला असं दिलं उत्तर

या फ्लॅशबॅकमध्ये जॅकी श्रॉफ दिसतो. जॅकीने सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका केली आहे. यानंतर सलमान मर्चंट नेवीच्या ड्रेसमध्ये दिसतो. शेवटी वाघा बॉर्डवरवरचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनचा फोटो सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

आराध्यासोबत स्विमिंग पूलमध्ये दिसली ऐश्वर्या, Photo Viral

सलमान खानचा हा सिनेमा यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमात कतरिना कैफ, सलमान खान, सुनील ग्रोवर, जॅकी श्रॉफच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...