मुंबई, 26 आॅगस्ट : 'भारत'चं शूटिंग जोरात सुरू आहे. प्रियांका चोप्राच्या जागी कतरिना कैफ आली. 'भारत'मध्ये आता आपल्याला कतरिना आणि सलमान खान दिसणार आहे. प्रियांकाचा विषय आता संपलाय. कॅट आणि सलमानचं प्रेम पुन्हा बहरणार असं दिसतंय. कारण सलमाननं फेसबुकवर सुशील कन्या असा कतरिनाचा उल्लेख केला होता. आता भारतसाठी तर प्रियांका नक्की झाली होती. ऐनवेळी कतरिनाला विचारलं आणि तिनं कुठलाच इगो प्राॅब्लेम न आणता पटकन हो म्हटलं.
'भारत'चा एक पहिला फोटो बाहेर आलाय. त्यात सलमानच्या बाहुपाशात कतरिना आहे. खुद्द सलमाननं हा फोटो ट्विट केलाय. सिनेमाचं शूटिंग माल्टा इथे सुरू आहे. दोघंही भारतीय पोशाखात आहेत. ते एकमेकांसोबत खूप सुंदर दिसतायत.
#Bharat @Bharat_TheFilm pic.twitter.com/6obMM9y7KT
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 25, 2018
सलमान-कतरिनाच्या या फोटोला 30 मिनिटांत ट्विटरवर 6,529 लोकांनी पसंत केलं. सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करतोय. या सिनेमानंतर सलमान दबंग 3चं शूटिंग करणार आहे.
कॅटनं अचानक सलमानला होकार का दिला असेल? याबद्दल कॅट सांगते, 'अली अब्बास जफर आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'टाइगर जिंदा है' हे सिनेमे आम्ही एकत्र केलेत. ते खूप चांगले चाललेत. मग ऐनवेळी मला विचारलं, रिप्लेसमेंट केली असे विचार मी का आणायचे?'
ती म्हणते, ' मी भारतचं पूर्ण स्क्रीप्ट वाचलं. माझी भूमिका काय आहे ते पाहिलं. ते सगळंच खूप दमदार आहे. म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. '
सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय. सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे.
VIDEO : केरळमध्ये महाप्रलयानंतर आता घरात शिरताहेत मगरी!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat, First look, Katreena kaif, Salman khan, कतरिना कैफ, भारत, सलमान खान