'या' मराठमोळ्या हिरोईनसाठी दबंग सलमाननं सेटवर केली मोबाइल बंदी, कोण आहे 'ती'?

'या' मराठमोळ्या हिरोईनसाठी दबंग सलमाननं सेटवर केली मोबाइल बंदी, कोण आहे 'ती'?

बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

  • Share this:

मुंबई, 8 ऑगस्ट : बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाबाबत नेहमीच काही ना काही चर्चा कानावर येत असतात. कधी सेटवरील कोणता फोटो व्हायरल होतो तर कधी व्हिडिओ. याशिवाय या सिनेमाच्या कथेबद्दलही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता या सिनेमाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सलमान खाननं या सिनेमाच्या सेटवर मोबाइल वापरण्यास सक्त मनाई केली आहे.

सलमाननं असं करण्यामागे त्याला आणि फिल्म मेकर्सना वाटत असलेली भीती असल्याचंही बोललं जात आहे. सलमाननं या सिनेमाबाबत एक सक्तीची सुचना केली आहे. ज्यानुसार सिनेमाच्या सेटवर मोबाइल फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सूत्राच्या माहितीनुसार यामागे सिनेमाच्या सीनच्या प्रायव्हसीचा प्रश्न असल्याचं सांगण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून या सिनेमातील सीन्स आणि काही फोटो सतत लीक होत असल्यानं सिनेमाच्या टीमनं हा निर्णय घेतला आहे.

Wonderful Sara! सारा अली खानच्या एअरपोर्ट लुकचं ऋषी कपूर यांनी केलं तोंडभर कौतुक

या सिनेमातील सलमान खान म्हणजेच चुलबुल पांडेचा लुक समोर आला आला. मात्र आता फिल्म मेकर्सना महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरचा लुक लपवायचा असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. सई मांजरेकर ‘दबंग 3’मधू बॉलिवूड डेब्यू करत आहे. त्यामुळे तिला या सिनेमाच्या रिलीज पर्यंत मीडियाशी बोलण्यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच तिनं कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरू नये असंही सांगण्यात आलं आहे. सई व्यतिरिक्त या सिनेमात सोनाक्षी सिन्हा सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘दबंग 3’चं दिग्दर्शन प्रभूदेवा करत असून हा सिनेमा येत्या 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

प्रियांका चोप्राच्या पतीला जवळपास 46 कोटींचं घर विकावं लागलं, कारण...

‘दबंग 3’ची कथा फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार असून यात सलमानला यंग दाखण्यात येणार आहे. या लुकसाठी सलमाननं 8 किलो वजन कमी केलं असून त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत सई मांजरेकर साकारणार असल्याचं बोललं जात आहे. तर सोनाक्षी रज्जोच्या भूमिकेत सलमान खानच्या अपोझिट दिसणार आहे. सलमानच्या मोबाईल बॅन करण्याच्या फर्मानामुळे आता सर्व क्रू मेंबर्सना सेटवर एंट्री करण्याआधी फोन काउंटरवर जमा करावा लागत आहे.

बंद करा हा तमाशा! 'या' TMC खासदारानं हनिमूनचे PHOTO केले शेअर, नेटिझन्स भडकले

============================================================================

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

Published by: Megha Jethe
First published: August 8, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading