Home /News /entertainment /

सलमान खान आणि आयुष शर्माच्या अ‍ॅक्शन थ्रिलर'Antim'ची प्रतीक्षा संपली! या तारखेला रिलीज होणार चित्रपट

सलमान खान आणि आयुष शर्माच्या अ‍ॅक्शन थ्रिलर'Antim'ची प्रतीक्षा संपली! या तारखेला रिलीज होणार चित्रपट

चाहते सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

    मुंबई, 13ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood)अभिनेता सलमान खानच्या(Salman Khan) प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळेच चाहते सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ'(Antim: The Final Truth) चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. यामध्ये सलमानची बहीण अर्पिताचा पती अर्थातच अभिनेता आयुष् शर्मासुद्धा दमदार भूमिकेतआहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं आम्ही आधीच आपल्याला सांगितलं होतं. त्यांनतर चाहत्यांना चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा लागून होती. आता ही प्रतीक्षा देखील संपली आहे. कारण सलमान खानने नुकताच चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. अभिनेता सलमान खानने नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे. 'अंतिम:द फायनल ट्रुथ' जगभरातील चित्रपटगृहात २६-११-२०२१ ला म्हणजेच २६ ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे.झी आणि पुनीत गोयंकासोबत आमचं एक दिमाखदार असोसिएशन आहे. अलीकडच्या काही वर्षांत आम्ही अनेक चित्रपट जसे की - रेस 3, लवयात्री, भारत, डी 3, राधे आणि आता अंतिम त्यांच्यासोबत केली आहेत. मला विश्वास आहे येत्या काही वर्षात ते झी ला आणखी उंच स्तरावर घेऊन जातील. (हे वाचा:Antim Poster: गणेशोत्सवाआधी सलमानची चाहत्यांना धमाकेदार भेट ... ) चित्रपटाचं पोस्टर- अभिनेता सलमान खानसहित अन्य कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाचं पाहिलं पोस्टर रिलीज केलं होतं. यामध्ये सलमान खानचा नवा लूक दिसून येत होता. शिवाय सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असल्याचं पोस्टरवर दिसलं होतं. त्यामुळे चित्रपटात या दोघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत होतं. तसेच चित्रपटात सलमान खान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंगप्रमाणे या चित्रपटातही सलमानचा पोलीस लूक पाहायला मिळणार आहे. तसेच आयुष शर्मासाठी हा चित्रपट खूप महत्वाचा असणार आहे. कारण आयुषने आत्तापर्यंत आपल्या चित्रपटातुन हवी तशी प्रसिद्धी मिळवली नाही. या चित्रपटामुळे त्याला बॉलिवूडमध्ये स्थिर होण्यासाठी एक चांगली संधी मिळू शकते. तसेच हा चित्रपट हिट ठरला तर त्याच्या करिअरला कलाटणी मिळणार हे नक्की.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Salman khan

    पुढील बातम्या