सलमान खान होणार ‘मास्टर’; येतोय ‘या’ सुपरहिट तमिळ चित्रपटाचा रिमेक

सलमान खान होणार ‘मास्टर’; येतोय ‘या’ सुपरहिट तमिळ चित्रपटाचा रिमेक

या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये (Hindi Remake)मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा वाचल्यावर सलमान खाननं यात काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

  • Share this:

मुंबई 5 एप्रिलसलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलीवूडचा(Bollywood) हा दबंग स्टार (Dabang Star) आता दक्षिणेत (South India) सुपरहिट झालेल्या मास्टर (Master)या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये (Hindi Remake)मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची कथा वाचल्यावर सलमान खाननं यात काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

मूळ चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय (Thalpati Vijay) यानं मुख्य भूमिका साकारली असून, हा चित्रपट तिथं प्रचंड गाजला आहे. याचे हिंदी डब वर्जनही आलं होतं. कोरोना काळातील लॉकडाउन उठल्यानंतर देशभर प्रदर्शित झालेला सुपरस्टारचा हा पहिला चित्रपट होता. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटानं जबरदस्त कमाई केली.

अवश्य पाहा - दिशा पटानी कशी झाली इतकी Fit & Fine; सांगितलं आपल्या Fitnessचं रहस्य

अशा या चित्रपटाचा हिंदी रिमेक कबीर सिंह या चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी आणि एंडेमॉल शाईन (Endemol Shine) निर्माण करत आहेत. मास्टर चित्रपटात अभिनेता थलपती विजय यानं साकारलेली भूमिका किंवा यातील बडाई भवानी ही विजय सेतूपती (Vijay Sethupati) यानं साकारलेली भूमिका सलमान खान यानं करावी यासाठी गेल्या महिनाभरापासून निर्माता मुराद खेतानी सलमान खानशी चर्चा करत आहेत. बॉलीवूड मसालापटासाठी कथेत काही बदल केले जावेत असं या चर्चेदरम्यान सलमाननं सुचवल्याचं वृत्त आहे. त्यामुळं आगामी काळात सलमान खानचा आणखी एक भव्य अॅक्शनपट चाहत्यांना बघायला मिळू शकतो.

अवश्य पाहा - कोरोनाची भीती कुणाला? इलियाना डिक्रूजला पाहण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी

सध्या सलमान खानचे चाहते त्याच्या राधे-द मोस्ट वाँटेड भाई (Radhe : Your Most Wanted Bhai)या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ईदच्या मुहूर्तावर 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रभू देवा (Prabhu Deva) यानं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जबरदस्त अॅक्शन-ड्रामापट असून, 2021 मध्ये प्रदर्शित होणारा हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आहे. यामध्ये सलमान खानसह जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेसह सलमान खान सध्या टायगर 3च्या (Tiger 3) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुंबईत सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून, जूनमध्ये याचे उर्वरीत शूटिंग परदेशात करण्याचे नियोजन आहे. सप्टेंबरमध्ये हे शूटिंग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. किक 2 (Kick 2) या चित्रपटातूनही सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडीयादवाला निर्मित कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातही सलमान खान काम करणार आहे.

First published: April 5, 2021, 7:03 PM IST

ताज्या बातम्या