मुंबई, 13 मार्च: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आगामी चित्रपट 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe: Your Most wanted Bhai) या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या भाईजानने आपल्या चाहत्यांना सांगितलं होतं की ईदच्या दिवशी राधे चित्रपट प्रदर्शित केला जाईल. आता चाहत्यांना दिलेलं वचन सलमान खान पूर्ण करताना दिसत आहे. सलमान खानने नुकतचं या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची (Radhe film Release Date) घोषणा केली आहे.
सलमनाने ट्वीट करत 'राधे'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच एक नवीन पोस्टर देखील शेअर केलं आहे. सलमान खानने राधे चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करताना सांगितलं की , हा चित्रपट 13 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानने या चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह सोशल मीडियावर कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'ईदची कमेंटमेंट होती, तर ईदलाच येणार, कारण एकदा का मी कमेंटमेंट केली...'. या कॅप्शनसोबतच सलमान खानने #RadheOn13thMay # 2MonthsToRadhe हे हॅशटॅगही वापरले आहेत. सलमान खानच्या या घोषणेनं चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Eid ka commitment tha, Eid par hi aayenge kyun ki ek baar jo maine.......#RadheOn13thMay #2MonthsToRadhe@bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @SKFilmsOfficial @ZeeStudios_ @SohailKhan @atulreellife @ReelLifeProdn @ZeeMusicCompany pic.twitter.com/mvBxUJPSFp
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 13, 2021
राधे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होतं. प्रभु देवा दिग्दर्शित हा अॅक्शन-ड्रामा 2021 मधील बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. पण या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अद्याप दोन महिने बाकी आहेत. सलमान खानचा हा राधे चित्रपट अॅक्शन, ड्रामा आणि मनोरंजनाने परिपूर्ण भरलेला आहे.
(हे वाचा- कतरिना कैफचा रावडी अवतार; सलमानचा गळा पकडत म्हणाली...)
या चित्रपटात सलमान खानसोबतचं दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओने संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर बिग बॉस 14 च्या फिनालेपासून या चित्रपटाच्या प्रोमोशनला सुरुवात झाली होती. या प्रोमोशन कार्यक्रमात रणदीप हुडाने देखील हजेरी लावली होती. यावेळी सलमान खानने नेहमीप्रमाणे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आपल्या शैलीत चाहत्यांसमोर जाहीर केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan