#IssaqbaaziOutNow Video : सलमान खान शाहरुखला शिकवतोय इशकबाजी!

#IssaqbaaziOutNow Video : सलमान खान शाहरुखला शिकवतोय इशकबाजी!

झीरो सिनेमाचं नवं गाणं लाँच झालंय. त्यात शाहरुख खान आणि सलमान खान तुफान नाचलेत.हे रोमँटिक गाणं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर : शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात तणाव असल्याच्या बातम्या नेहमीच यायच्या. दोघांमध्ये कोल्ड वाॅरही सुरू होतं. पण आता पुन्हा एकदा दोघांमधली मैत्री चांगलीच बहरतेय. आता तर ते दोघं इशकबाजी करतायत.

होय, झीरो सिनेमाचं नवं गाणं लाँच झालंय. त्यात शाहरुख खान आणि सलमान खान तुफान नाचलेत.हे रोमँटिक गाणं आहे. त्याचं संगीत अजय-अतुलचं आहे.  शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा रोमँटिक अँगलही पोस्टरवर दिसतो.

झिरो हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खानने लहान उंचीच्या माणसाची व्यक्तीरेखा साकारली आहे. प्रत्येकवेळी आपल्या अभिनयातून प्रक्षकांच्या मनात छाप पाडणारा कलाकार शाहरूख खान यावेळीसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.

त्याचबरोबर सिनेमात भाईजान सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, जुही चावला, करिष्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट हे पाहुणे कलाकार असणार आहेत. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार श्रीदेवी सुद्धा आपल्या दिसणार आहे.

उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित झिरो चित्रपट आहे. 1989 रोजी कमल हसनने ’अप्पू राजा’ सिनेमातून अशा बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 31 वर्षांनी असा वेगळा प्रयोग ‘झिरो’ चित्रपटातून तयार करण्यात आला आहे.

सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे.

'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना

First published: December 4, 2018, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading