मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: आमिर खान- शाहरुख खान दिसणार एकत्र? करण जोहरने केला खुलासा

Koffee With Karan 7: आमिर खान- शाहरुख खान दिसणार एकत्र? करण जोहरने केला खुलासा

 बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) रिऍलिटी चॅट शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan Season 7)  हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला शो आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी सहभागी होताना दिसतात. सध्या हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 जुलै-  बॉलिवूड (Bollywood) दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा (Karan Johar) रिऍलिटी चॅट शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan Season 7)  हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला शो आहे. ज्यामध्ये सेलिब्रिटी सहभागी होताना दिसतात. सध्या हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. तब्बल 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर करण शेवटी डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'कॉफी विथ करण'च्या 7 व्या सीजनसह परतला आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया-रणवीर सहभागी झाले होते. त्यांनतर आता येत्या एपिसोडमध्ये आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

चाहत्यांच्या मनात निर्माण होत असलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता स्वतः करण जोहरनेच दिली आहेत. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत, करण जोहरने खुलासा करत सांगितलं की, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कॉफी विथ करणच्या सीजन 7 चा पाहुणा असणार आहे. परंतु शाहरुख खान शोच्या या सीजनचा भाग नसल्याचंही करणने सांगितलं.त्यामुळे त्याचे चाहते काही प्रमाणात नाराज झाले आहेत. मात्र सलमानच्या उपस्थितीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीय.

दरम्यान शाहरुखबाबत बोलताना करण जोहर म्हणतो- मला वाटतं शाहरुखने थेट 'पठाण'च्या वेळीच धमाका करायला हवा. म्हणूनच मला माहित आहे की तो आजकाल माध्यमांपासून खूप दूर आहे. तो सध्या जास्त माध्यमांचा सामना करत नाही आणि त्याच्यासाठी हा सर्वोत्तम निर्णय आहे. कारण पठाण आल्यावर बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार आहे. शाहरुख खानने लोकांना प्रतीक्षेत ठेवले आहे. आणि त्यांची उत्सुकताही कायम ठेवली आहे. मला माहिती आहे की तो देशातील सर्वात मोठा स्टार आहे. आणि मला हीसुद्धा खात्री आहे, आज चाहते त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला जितकं प्रेम देतील, त्याच्या दुप्पट प्रेम आणि मनोरंजन तुला तुम्हाला परत करेल''.

(हे वाचा:कतरिना-आलियापेक्षा कमी नाहीय पायल रोहतगीचा Bridal Look; पाहा सेलिब्रेटी कपलचा Wedding Album )

पिंकविलाच्या वृत्तानुसार, विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​देखील या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. शाहरुख खान या शोमध्ये सहभागी होणार नसला तरी त्याची पत्नी गौरी खान, शनाया कपूरची आई महीप कपूर आणि अनन्या पांडेची आई भावना पांडे या शोमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीय. दरम्यान समंथा प्रभूसोबतच साऊथचे काही स्टार्ससुद्धा या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Karan Johar, Salman khan, Shahrukh khan