मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salman Khan: अन् 32 वर्षांनंतर सलमान खान पुन्हा झळकणार 'या' अभिनेत्रीसोबत! 'टायगर 3' साठी येणार एकत्र

Salman Khan: अन् 32 वर्षांनंतर सलमान खान पुन्हा झळकणार 'या' अभिनेत्रीसोबत! 'टायगर 3' साठी येणार एकत्र

सलमान खान

सलमान खान

सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्याच्या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे. या अभिनेत्रीसोबत सलमान तब्ब्ल 32 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 27 नोव्हेंबर : गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या 'टायगर 3' चित्रपटाची चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी अनेक दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत आहेत. खरे तर २०२२ मध्ये सलमान खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. 2023 मध्ये त्याचे 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दरम्यान, टायगर 3 बद्दल सलमान खानने मोठी घोषणा केली आहे. सलमानची ही घोषणा त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या मोठ्या ट्रीटपेक्षा कमी नाही.

सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्याच्या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार आहे. या अभिनेत्रीसोबत सलमान तब्ब्ल 32 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे. ही  अभिनेत्री म्हणजे रेवती. विशेष म्हणजे रेवतीने 1991 मध्ये 'लव्ह' या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हा सलमान खान तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसला होता. आता त्या नंतर हे दोघे  'टायगर 3' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. अशा प्रकारे हे दोन्ही तारे ३१ वर्षांनंतर पुन्हा  एकदा एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा - Salman Khan : सलमान खानची भाची करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; कोण आहे अलिझेह अग्निहोत्री?

E-Times च्या रिपोर्टनुसार, मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या चित्रपटात रेवतीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. या चित्रपटात रेवती रॉ चीफच्या भूमिकेत दिसणार आहे जी सलमान खानची मेंटॉर असेल. सलमान खानच्या टायगर फ्रँचायझी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन चित्रपटांमध्ये गिरीश कर्नाड यांनी रॉ चीफची भूमिका साकारली होती. गिरीश कर्नाड यांचे २०१९ मध्ये निधन झाले. त्यामुळेच आताही  भूमिका रेवती निभावणार आहे.

'टायगर 3' रिलीज डेट 

दरम्यान, 'टायगर 3' ची वाट पाहत असलेल्या चाहत्यांना आता या चित्रपटाच्या रिलीजसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सलमान खानने या चित्रपटाची नवीन रिलीज डेट शेअर केली आहे.  दिवाळी 2023 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान, मनीष शर्मा सलमान खानच्या 'टायगर 3'चे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी, दानिश हुसैन आणि कुमुद मिश्रा सारखे कलाकार दिसणार आहेत. आता या यादीत रेवतीचं  नावही जोडलं गेलं आहे.

1991 मध्ये रिलीज झालेला 'लव्ह' हा चित्रपट 'प्रेमा' या तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन सुरेश कृष्णा यांनी केले होते. सलमान खान आणि रेवती 'लव्ह' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटातील 'साथिया तुने क्या किया' हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. रेवतीने हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या तो दिग्दर्शनातही सक्रिय आहे. रेवती दिग्दर्शित 'सलाम वेंकी' हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल आणि कमल सदानासह इतर स्टार्स दिसणार आहेत.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Salman khan