मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अबब! सलमान-रणबीर ने एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात खर्चले इतके कोटी! कतरिनाला दिल्या 'या' भेटवस्तू ?

अबब! सलमान-रणबीर ने एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात खर्चले इतके कोटी! कतरिनाला दिल्या 'या' भेटवस्तू ?

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif Wedding)  आणि विकी कौशल यांच्या लग्नाने चाहत्यांपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच वेड लावलं होतं. या दोघांनी अधिकृत घोषणा न केल्याने सर्वच संभ्रमात होते. मात्र लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री कतरिना कैफ  (Katrina Kaif Wedding)  आणि विकी कौशल यांच्या लग्नाने चाहत्यांपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच वेड लावलं होतं. या दोघांनी अधिकृत घोषणा न केल्याने सर्वच संभ्रमात होते. मात्र लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. दरम्यान कतरिनाच्या करिअरपासून ते तिच्या एक्स पर्यंत अनेक गोष्टींवर सोशल मीडियावर चर्चा झाली. अशातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. यानुसार सलमान खान   (Salman Khan)  आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor)  एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला लग्नात अतिशय महागड्या भेटवस्तू दिल्याचं म्हटलं जात आहे.

कतरिना आणि विकीचं लग्न हे सोशल मीडियावर जणू एक ट्रेंड बनला होता. त्यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या पाहायला मिळत होत्या. लग्नानंतरसुद्धा या चर्चा थांबलेल्या नाहीत. नुकताच अशी चर्चा सुरु झाली आहे, कि या लग्नात कतरिनाला तिच्या एक्स कडून कोट्यवधींच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री कैफला तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूडचा दबंग सलमान खानने तब्बल तीन कोटींची रेंज रोव्हर भेट केली आहे.सलमान खान नेहमीच आपल्या दिलखुलास व्यक्तीमत्वामुळे ओळखला जातो. मात्र आपल्या एक्सच्या लग्नात दिलेल्या महागड्या भेटवस्तूमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

तर दुसरीकडे अभिनेता रणबीर कपूरसुद्धा मागे नाही. असं म्हटलं जात आहे, की रणबीर कपूरने कतरिनाला तिच्या लग्नात २.७ कोटींचा हिऱ्यांचा हार भेट केला आहे. रणबीर आणि कतरिना अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही खाजगी गोष्टींमुळे त्यांचा ब्रेकअप झाला होता. तसेच रणबीर कपूरची आत्ताची गर्लफ्रेंड आलिया भट्टनेसुद्धा लाखो रुपयांचे परफ्यूम्स कतरिनाला भेट म्हणून दिले आहेत. आलिया भट्ट जरी रणबीर कपूरची गर्लफ्रेंड असली, तरी ती कतरिना कैफची खास मैत्रीण आहे. या दोघींमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे.

गेली अनेक दिवस बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा होती. अखेर हे दोघे ९ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो शेअर करत आपल्या नवीन प्रवासाची कल्पना दिली होती. या दोघांनी राजस्थानमधील बरवाडा येथील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट येथे अगदी शाही थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नासाठी जेवणापासून ते मेहंदीपर्यंत, कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत अनेक शाही थाट करण्यात आले होते. लग्नात हे दोघेही एखाद्या राजा-राणीसारखे दिसत होते.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Ranbir kapoor, Salman khan