मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tiger 3: सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Tiger 3: सलमान खानच्या 'टायगर 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Tiger 3

Tiger 3

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' या चित्रपटाची अखेर रिलीज डेट समोर आली आहे. पाहा VIDEO

  मुंबई, 15 ऑगस्ट: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे 'टायगर 3'. गेल्या अनेक दिवसांपासून टायगर 3 चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर  'टायगर 3' या चित्रपटाची अखेर रिलीज डेट समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच आनंद पहायला मिळतो. खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चित्रपटाविषयी अपडेट समोर आली आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून चाहते तिसऱ्या भागासाठीही कमालीचे उत्सुक होते. 'एक था टायगर चित्रपटाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्मात्यांनी चित्रपटाच्या पुढील सिक्वेलची रिलीज डेट जाहीर केली आहे (Tiger 3 Realease Date). त्यामुळे सलमान आणि कतरिनाचे चाहते खूप आनंदी आणि उत्सुक असल्याचे दिसतायेत. 2012 साली स्वातंत्र्याच्या शुभ मुहूर्तावर सलमान खानचा एक था टायगर रिलीज झाला होता आणि आज स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर 'टायगर 3' रिलीज डेट शेअर केली आहे. हेही वाचा -  Pippa Teaser Out: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित चित्रपट; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर दमदार टीझर प्रदर्शित सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी 'टायगर 3' चित्रपटाची रिलीड डेटही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' पुढील वर्षी 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं आहे.
  दरम्यान, मनीष शर्मा सलमान खानच्या 'टायगर 3'चे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी, दानिश हुसैन आणि कुमुद मिश्रा सारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood, Katrina kaif, Salman khan, Upcoming movie

  पुढील बातम्या