Home /News /entertainment /

Salute to Mumbai police! Bollywood celebrity करतायेत मुंबई पोलिसांचं कौतुक; खास आहे कारण

Salute to Mumbai police! Bollywood celebrity करतायेत मुंबई पोलिसांचं कौतुक; खास आहे कारण

मुंबई पोलिसांनी महिलांच्या(Mumbai Police Nirbhaya Squad) सुरक्षेसाठी निर्भय स्क्वाड या नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. लैंगिक छळ आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे महिलांवरील गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 जानेवारी- मुंबई पोलिसांनी महिलांच्या(Mumbai Police Nirbhaya Squad) सुरक्षेसाठी निर्भय स्क्वाड या नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. लैंगिक छळ आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे महिलांवरील गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एक विशेष टीम गुन्ह्यांच्या हॉटस्पॉटवर लक्ष ठेवणार असून महिला निवारा आणि वसतिगृहांमधून गुप्तचर माहिती गोळा करण्यावर भर देणार आहे. आज, 26 जानेवारीच्यानिमित्ताने ‘निर्भया स्क्वाड’ने त्यांचा ऑफिशिअल हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. को शुरू कर दिया है. बॉलिवूड कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. विकी कौशलने महिलांवर रोज होण्याऱ्या अत्याचारावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. विकी कौशलने म्हटलं आहे की.... विकी कौशलने या व्हिडिओच्या कॅप्शनेमध्ये म्हटलं आहे की, निर्भया स्वाड मुंबई शहरातील माहिलांसाठी महिलांसाठी एक समर्पित पथक आहे. '103' हा हेल्पलाइन क्रमांक आहे, जो महिलांशी संबंधित कोणत्याही गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी किंवा ज्या महिला संकटात सापडलेल्या आहेत त्या वापरू शकतात. शाहिद कपूरने मुंबई पोलिसांना दिल्या शुभेच्छा शाहिद कपूरने ट्वीट करत म्हटलं आहे की, निर्भया स्क्वाड नावाने सुरू केलेल्या या सेफ्टी सेलसाठी मुंबई पोलिसांना शुभेच्छा! ते पुढे म्हणाले की, महिलांची सुरक्षा आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हे स्क्वाड मुंबई शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात येणार आहे. संकाटाच्या काळात कोणीही हेल्पलाइन नंबर 103 वर संपर्क करू शकतात. हे एक चांगलं पथक आहे. यामुळे महिलाच्यावरील अन्याय होण्यास मदत होईल. कतरिना कैफने महिलांना केली विनंती कतरिना कैफने महिलांना विनंती केली आहे की, हा नंबर आपल्या स्पीड डायलवर ठेवावा. तर सारा आली खानने देखील हा हेल्पालाईन नंबर शेअर करत जागरूकता निर्माण केली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

  सलमान खानने देखील मुंबई पोलिसांचे मानले आभार सलमान खानने ट्वीट करत म्हटलं आहे की, महिलांच्या सुरेक्षेच्यादृष्टीने निर्भया स्क्वाड केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार. नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले आणि गरजू महिलांसाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Marathi entertainment, Salman khan, Vicky kaushal

  पुढील बातम्या