Home /News /entertainment /

Tiger 3: सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत, तारीख जाहीर

Tiger 3: सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत, तारीख जाहीर

सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) ही जोडी टायगर-3 (Tiger-3) या तिसर्‍या चित्रपटाची तयारी करत आहेत.

    मुंबई, 22 डिसेंबर: सध्या जगभरात कोरोना विषाणूचा (corona virus) वाढता प्रादुर्भाव आणि संबंधित विविध नियमावलीमुळे चित्रपटांच (Films) चित्रीकरण करणं अवघड बनत चाललं आहे. असं असलं तरी बॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या चित्रपटांबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. यातील काही चित्रपटांचे शूटींग चालू आहे आणि तर काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अलीकडेच या जोडीनं 'टायगर जिंदा है' (Tiger Zinda Hai) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) सुपरहिट ठरवला होता. आता ही जोडी टायगर-3 (Tiger-3) या तिसर्‍या चित्रपटाची तयारी करत आहेत. या चित्रपटासाठी चाहते दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. टायगर 3 हा सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीचा नववा चित्रपट असेल. ईटाइम्सच्या बातमीनुसार, या चित्रपटाचं काम सुरू झालं असून शुटिंगची तारीखही समोर आली आहे. ईटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि कतरिना मार्च 2021 पासून 'टायगर 3' च्या शुटिंगला सुरुवात करणार आहेत. यासोबतच या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईत होणार असल्याचेही सांगितलं जात आहे. तर यानंतरचं उर्वरित शूटिंग मध्य पूर्व (आखाती राष्ट्र) देशांत केलं जाणार आहे. एवढंच नाही तर या आगामी चित्रपटात तुम्हाला शाहरुख खान (Shahrukh khan) देखील दिसणार आहे. चित्रपटातील एका खास सिनमध्ये शाहरुख खान दिसेल. टायगर फ्रेंचायझीच्या या चित्रपटाचं बजेटही खूप जास्त असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचं बजेट 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटांपेक्षा खूप जास्त असेल. दरम्यान या चित्रपटाचं नाव तेच ठेवलं जाईल की नाही, यावर सध्या चर्चा सुरू आहे. कदाचित या चित्रपटाचं नावही बदललं जाऊ शकतं. शिवाय यश राज फिल्म (Yash raj Films) या चित्रपटाच्या खलनायकासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood, Katrina kaif, Salman khan

    पुढील बातम्या