मुंबई, 30 मे : अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान सध्या त्यांचा आगामी सिनेमा भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाच्या कोणत्याही प्रमोशन इव्हेंटदरम्यान सलमान कतरिनाचं कौतुक करण्याची आणि प्रियांका चोप्राला टोमणा मारण्याची एकही संधी सोडताना दिसला नाही. नुकतीच या दोघांनीही डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर 3'मध्ये हजेरी लावली. पण यावेळी सलमान प्रियांका आणि कतरिना बाजूला ठेवत चक्क शिल्पा शेट्टीचा क्लास घेताना दिसला.
सलमान खाननं स्टेजवर एंट्री घेताच त्यानं लगेचच शिल्पावर निशाणा साधला. तो म्हणाला, या शोमध्ये जे जज आहेत ते सर्व खूपच दुर्मिळ आहेत. शिल्पाकडे पाहत त्यानं म्हटलं, कोण जास्तच रडतं तर कोण खूप जास्त हसतं असं म्हणत त्यानं गीताकडे पाहिलं. पण यासोबतच अनुराग बसूची स्तुती करायलाही सलमान विसरला नाही. अनुरागकडे पाहत तो म्हणाला, एक बरोबर बॅलन्स आहे. पण सलमाननं अशाप्रकारे सर्वांचा क्लास घ्यायला सुरुवात केल्यानंतर कतरिनानं मात्र त्याला थांबवत, 'शिल्पा आता सुरू झालं, स्वतःला वाचव' असा सल्ला शिल्पाला दिला.
20 वर्षांनंतर मेजर डी.पी. सिंहनी पाहिला 'सर्फरोश', आमिर खान का झाला भावूक?
It's a star-studded weekend with @BeingSalmanKhan, Katrina and our Superstar Singer Judges, @javedali4u & Himesh Reshammiya! Are you ready? Don't forget to tune in to #SuperDancerChapter3, Sat-Sun, at 8 PM. @TheShilpaShetty @geetakapur @basuanurag @rithvik_RD @Pparitosh1 pic.twitter.com/jcLtmRBrCL
— Sony TV (@SonyTV) May 29, 2019
सलमान खान आणि कतरिनासोबत शूट केलेला 'सुपर डान्सर चॅप्टर 3'मधील हा एपिसोड येत्या शनिवारी टेलिकास्ट होणार आहे. यावेळी लहान मुलांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स पाहून सलमानही अवाक झाला. या शोचे प्रोमो रिलीज झाले असून यामध्ये सलमान आणि कतरिना लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. काही दिवासांपूर्वी सलमाननं कपिल शर्मा शोमध्येही हजेरी लावली होती त्यामुळे या शोच्या विकेंड एपिसोडमध्ये सलमानच्या लाइफमधील अनेक किस्से ऐकायला मिळणार आहेत.
'या' कारणासाठी सलमान खानला जावं लागलं होतं वर्गातून बाहेर
Fun and games ensue as @BeingSalmanKhan and Katrina bring the laughter riot to you! Catch them on #TheKapilSharmaShow, this weekend, at 9:30 PM. @KapilSharmaK9 @kikusharda @haanjichandan @Krushna_KAS @bharti_lalli @sumona24 @RochelleMRao @trulyedward @banijayasia @apshaha pic.twitter.com/4xtlmTN47q
— Sony TV (@SonyTV) May 28, 2019
सलमानचा 'भारत' हा सिनेमा येत्या 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांसोबतच सलमान आणि कतरिनालाही खूप अपेक्षा आहेत. सलमाननं तर या सिनेमासाठी कतरिनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असंही म्हटलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांचं असून सलमान आणि कतरिनासोबत तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर आणि दिशा पाटनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा