Home /News /entertainment /

लॉकडाऊनमध्ये जॅकलिन-सलमान झाले रोमँटिक, 'तेरे बिना'ला मिळाले 3 लाखांपेक्षा जास्त हिट्स

लॉकडाऊनमध्ये जॅकलिन-सलमान झाले रोमँटिक, 'तेरे बिना'ला मिळाले 3 लाखांपेक्षा जास्त हिट्स

या गाण्यात सलमान आणि जॅकलिन फर्नांडिसची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

    मुंबई, 12 मे : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं या लॉकडाऊनच्या कठीण काळातही चाहत्यांचं मनोरंजन करायची सोडलेली नाही. सलमान खानचं बहुप्रतीक्षित गाणं 'तेरे बिना' नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या गाण्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. रिलीज होताच या गाण्यानं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात सलमान आणि जॅकलिन फर्नांडिसची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 'तेरे बिना' हे रोमँटिक साँग सलमान खाननं स्वतः गायलं असून या गाण्यात सलमान आणि जॅकलिनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण गाणं सलमानच्या पनवेल फार्म हाऊस आणि आसपासच्या परिसरात शूट करण्यात आलं आहे. या गाण्यातली दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमाननं सांगितलं होतं की, हे गाणं त्याच्या एका मित्रानं लिहिलं आहे. पण हे गाणं कोणत्याही सिनेमात फिट बसत नव्हत त्यामुळे सलमाननं हे गाणं आता शूट करून रिलीज करण्याचा प्लान बनवला. सलमाननं सांगितलं की इथे उपलब्ध असेलेलं सामान आणि नॅचरल लाइटमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं असून शूटिंगसाठी त्यांना 4 दिवस लागले.
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Salman khan

    पुढील बातम्या