मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानचा अ‍ॅक्शन थ्रिलर 'अंतिम' OTT वर होणार रिलीज! वाचा कधी आणि कुठे होणार स्ट्रीम?

सलमान खानचा अ‍ॅक्शन थ्रिलर 'अंतिम' OTT वर होणार रिलीज! वाचा कधी आणि कुठे होणार स्ट्रीम?

आज जवळजवळ सर्व मोठे निर्माते   (Producer)   आपला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटी   (OTT)  रिलीजसाठी पुढे येत आहेत. यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चित्रपटांची कमाईसुद्धा  वाढली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 23 डिसेंबर-  आज जवळजवळ सर्व मोठे निर्माते   (Producer)   आपला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटी   (OTT)  रिलीजसाठी पुढे येत आहेत. यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चित्रपटांची कमाईसुद्धा  वाढली आहे. गेल्या वेळी सलमान खाननं   (Salman Khan)  त्याचा 'राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट 'zee 5' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला होता, यावेळीही तो तेच करणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'अंतिम: द फायनल ट्रुथ' हा चित्रपट या महिन्यात 24 डिसेंबरला  OTT प्लॅटफॉर्म 'Zee5' (Antim: The Final Truth zee5) वर रिलीज होत आहे. पुन्हा एकदा ओटीटी प्रेक्षक सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या अॅक्शनपॅक्ड ड्रामा 'अंतिम'चा आनंद घेतील.

'अंतिम' 26 नोव्हेंबरला  थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.  त्यातील काही अॅक्शन सीक्वेन्सला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनीही या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे सलमानच्या वाढदिवसाआधीच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. कलाकारांच्या चाहत्यांसाठी या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी ही एक मतही मेजवानीच आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.  'zee 5' वर सलमान खानचे अनेक क्लासिक चित्रपट आहेत. 24 डिसेंबरपासून प्रेक्षकांना या प्लॅटफॉर्मवर 'अंतिम' पाहता येणार आहे. zee 5 वर 'वॉन्टेड', 'नो एन्ट्री, 'हॅलो ब्रदर', 'हम आपके है कौन', 'मैने प्यार किया', 'हम साथ साथ है' असे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत.

मनीष कालरा ('zee 5' चे अधिकारी) म्हणतात की, हा प्लॅटफॉर्म लोकांना चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे. 'राधे' आणि 'कागज'ला 'zee 5' वर यश मिळालं  आहे. पुन्हा एकदा सलमान खानसोबत जोडले गेल्याने फारच आनंद होत आहे.  सलमान खानच्या वाढदिवसाआधी हा चित्रपट डिजिटल पद्धतीने प्रदर्शित होत आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांना ही वाढदिवसाची भेट आवडेल अशी आशा आहे.

(हे वाचा:Justin Bieber च्या गाण्यावर Alia Bhatt चा देसी डान्स; जबरदस्त VIDEO VIRAL)

बॉक्स ऑफिस कमाई-

चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच रिलीज दिवशी 5.03 कोटी, दुसऱ्या दिवशी 6.03 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 7.55 कोटींची कमाई केली. त्याचवेळी, चौथ्या दिवशी  या चित्रपटाने 2.75 कोटींवरून 3 कोटींची कमाई केली होती. सुरुवातीपासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कमाईचा असा वेग होता. या चित्रपटातून टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा मखवनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे

First published:

Tags: Entertainment, Salman khan