सलमानसाठी या अभिनेत्रीने घातला मिनी ड्रेस, लगेच मिळाली भूमिका!

सलमानसाठी या अभिनेत्रीने घातला मिनी ड्रेस, लगेच मिळाली भूमिका!

मला सांगण्यात आलं होतं की ही भूमिका ग्लॅमरस मोलकरणीची आहे. त्यामुळे त्यांनी मला शॉर्ट ड्रेस घालायला सांगितला.

  • Share this:

मुंबई, ३१ मार्च- तसं बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवीन कलाकार येतात. काही हिट होतात तर काही फ्लॉप. पण या सगळ्यात काही असे असतात जे आपल्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैत. अनुराग बासू आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या सेक्रेड गेम्स या वेबसीरिजमधून कुकु अर्थात कुब्रा घराघरात पोहोचली.

कुकुच्या व्यक्तिरेखेमुळे कुब्रा एका रात्रीत सोशल मीडियाची स्टार झाली. पण तुम्हाला माहीत आहे का की कुब्राने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात सलमान खानच्या एका सिनेमातून केली होती. या सिनेमात तिची फार छोटी भूमिका होती. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कुब्राने तिच्या सुरवातीचे स्ट्रगचे किस्से सांगितले. सलमानच्या सिनेमात तिला एका मोलकरणीची भूमिका मिळाली होती.

कुब्रा म्हणाली की, सलमान खान आणि असीनच्या रेडी सिनेमासाठी मोलकरणीच्या भूमिकेच्या ऑडिशनला ती गेली होती. पण ही भूमिका तिला ऑडिशन न देताच मिळाली होती. कुब्राला अभिनयाचा फारसा अनुभव नव्हता. तिने मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत आल्यानंतर अनीस बाज्मी यांच्या सिनेमाबद्दल तिला कळलं आणि हा सलमानचा रेडी सिनेमा होता. कुब्रा अनीस यांच्या ऑफिसमध्ये गेली. ‘मला माहीत होतं की ती एक मोलकरणीची भूमिका आहे म्हणून मी पंजाबी ड्रेस घालून गेले. मला अजूनही आठवतं मी ऑफिसच्या बाहेर पाच तास वाट पाहत होती.’

‘मला सांगण्यात आलं होतं की ही भूमिका ग्लॅमरस मोलकरणीची आहे. त्यामुळे त्यांनी मला शॉर्ट ड्रेस घालायला सांगितला. मी जेव्हा शॉर्ट ड्रेस घालून आले तेव्हा अनिस यांनी मला पाहून सांगितलं की ‘ही चांगली आहे.’ असं मला सलमानच्या सिनेमात काम मिळालं.’

कुब्रा म्हणाली की, ‘मला अनेकांनी सांगितलं की छोट्या भूमिकांनी करिअरची सुरुवात करु नये. पण आज मला मी घेतलेल्या निर्णयाचा सार्थ अभिमान आहे. मला ज्या भूमिका करायला मिळाल्या नाहीत त्याचा मी फारसा विचार करत नाही. जे माझ्या हातात आहे त्यावरच मी लक्ष केंद्रीत करते.’ कुब्राने सलमानसोबत सुलतान सिनेमातही काम केलं आहे.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

First published: March 31, 2019, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading