'सेक्रेड गेम्स'मधल्या 'कुक्कू'नं शेअर केली बॉलिवूडमधली स्ट्रगल स्टोरी

'सेक्रेड गेम्स'मधल्या 'कुक्कू'नं शेअर केली बॉलिवूडमधली स्ट्रगल स्टोरी

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कुब्रानं बॉलिवूडमधील तिची स्ट्रगल स्टोरी शेअर केली.

  • Share this:

मुंबई, 31मार्च : बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवखे कलाकार आपलं नशीब आजमावत असतात. काही एका सिनेमातच हिट होतात तर काही जण कित्येक सिनेमे मिळूनही त्यांची जादू फारशी काही चालत नाहीत. पण काही कलाकार असे असतात जे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात पक्क घर निर्माण करतात. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैत. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमधून कुब्रानं सिनेरसिकांमध्ये आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या वेब सीरिजमध्ये तिनं साकारलेलं 'कुक्कू' हे पात्र सर्वांच्याच लक्षात राहिलं आहे. या भूमिकेमुळे स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण करणाऱ्या कुब्रानं आपल्या करिअरची सुरुवात एका छोट्याशा भूमिकेद्वारे केली होती. पण कुब्राची ही भूमिका फारशी कोणाच्या लक्षात राहिली नाही. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कुब्रानं बॉलिवूडमधली तिची स्ट्रगल स्टोरी शेअर केली. सलमान खानच्या सिनेमात तिला कामवालीची भूमिका कशी मिळाली?  हा अनुभव तिनं मुलाखतीत सांगितला. 'मी सलमान खान आणि असिनच्या 'रेडी' सिनेमात मोलकरणीच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला गेले होते. मात्र मला कोणत्याही ऑडिशनशिवायच ही भूमिका मिळाली', असं यावेळी कुब्रानं सांगितलं. जेव्हा कुब्रानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिनं मायक्रोसॉफ्टमधील चांगला जॉब सोडून बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत एण्ट्री केली. त्यावेळी तिला अभिनयाचा कोणताही अनुभव नव्हता.View this post on Instagram
 

Dreamy boo. Hair & Make Up: @ankchikara Ruffles: @madison_onpeddar @novakrishnan_couture


A post shared by Kubbra Sait (@kubbrasait) on

कुब्रा पुढे असंही म्हणाली की, 'मुंबईमध्ये आल्यावर मला अनीस बज्मींच्या सिनेमाविषयी समजलं. हा सलमानचा 'रेडी' सिनेमा होता. मी बज्मींच्या ऑफिसमध्ये गेले. एका कामवालीची भूमिका असल्याची कल्पना त्यांनी मला पूर्वीच दिली होती. त्यामुळे मी कुर्ती आणि पायजामा घालून गेले मात्र त्यामुळे मला तिथं तब्बल पाच तास वाट पाहावी लागली. मला असंही सांगण्यात आलं की एका सुंदर दिसणाऱ्या कामवालीची भूमिका साकारायची आहे आणि त्यासाठी मला शॉर्ट ड्रेस घालण्यास सांगितलं गेलं. जेव्हा मी शॉर्ट ड्रेस घालून गेले तेव्हा बज्मींनी कोणतीही ऑडिशन न घेताच त्या भूमिकेसाठी माझी निवड केली'.

मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटतो

'मला अनेकांनी सांगितलं की मी अशा लहान-मोठ्या भूमिकांपासून करिअरची सुरुवात करायला नको होती. पण मला माझ्या निर्णयांचा अभिमान वाटतो. मला न मिळालेल्या सिनेमांचा विचार करत नाही तर माझ्याकडे असलेल्या भूमिकांवर लक्ष केंद्रीत करत आहे',असंही तिनं ठामपणे मुलाखतीत सांगितलं. दरम्यान कुब्रानं सलमानच्या 'रेडी' सिनेमाव्यतिरिक्त 'सुलतान' सिनेमातही काम केलं होतं.

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या