सलमान आणि अरिजीत सिंगचा वाद निव्वळ अफवा; अरिजीत सिंगचं सिनेमात गाणंच नाही!

सलमान आणि अरिजीत सिंगचा वाद निव्वळ अफवा; अरिजीत सिंगचं सिनेमात गाणंच नाही!

अरिजीतने सिनेमात गाणं गायलं तर मी सिनेमातल्या पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार नाही असं सलमान खानने म्हटलं असल्याची चर्चा सुरू होती.

  • Share this:

21 फेब्रुवारी : सोनाक्षी सिन्हा आणि दिलजीत दुसंज यांच्या आगामी सिनेमातील अरिजीत सिंगच्या गाण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता. अरिजीतने सिनेमात गाणं गायलं तर मी सिनेमातल्या पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार नाही असं सलमान खानने म्हटलं असल्याची चर्चा सुरू होती. पण या सिनेमात अरिजीतने कोणतंही गाणं गायलं नव्हतं तर ते काढून तरी कसं टाकणार? असा सवाल या सिनेमाच्या निर्मात्यांनी विचारला आहे. एकुणच काय तर सलमान आणि अरिजीतमधील वादाच्या या चर्चा निव्वळ अफवा ठरल्यात.

सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यातील वाद अनेकांनाच माहित आहे. सोमवारी याच वादाने आणखी एक वळण घेतलं होतं. 'वेलकम टू न्यूयॉर्क' या आगामी चित्रपटात अरिजीतने गायलेलं गाणं सलमानने काढून टाकण्यास सांगितल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या सर्व अफवा असून अरिजीतने या चित्रपटात कोणतंच गाणं गायलं नसल्याचं निर्माते वाशू भगनानी यांनी स्पष्ट केलं.

सोनाक्षी सिन्हा आणि दिलजित दोसांज यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वेलकम टू न्यूयॉर्क' या चित्रपटातील 'इश्तेहार' या गाण्यावरून हा वाद रंगला होता. या चित्रपटात सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. पण अरिजीतसोबतचा वाद पाहता हे गाणं त्याने काढून टाकण्यास सांगितलं आणि पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड करण्यात आल्याची चर्चा होती.

पण या सगळ्या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झाल्याने अरिजीत आणि सलमानचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.

First published: February 21, 2018, 9:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading