Home /News /entertainment /

‘Dhoom 4’ मध्ये सलमान - अक्षयची जोडी झळकणार? ट्वीट्स Viral

‘Dhoom 4’ मध्ये सलमान - अक्षयची जोडी झळकणार? ट्वीट्स Viral

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सलमान (Salman Khan) दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे.

  मुंबई 12 जून : बॉलिवूडमधील सर्वात जास्त फ्रॅन्चायझी म्हणून प्रसिद्ध असलेला चित्रपट धूमच्या (Dhoom) पुढील सिक्वलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर पुढील भागात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सलमान (Salman Khan) दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. यशराज फिल्मसचा (YRF) हा एक मोठा फ्रॅन्चायझी चित्रपट आहे त्यामुळे प्रेक्षकही उत्सुक आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिषेक आणि जॉन अब्राहम  दिसले होते. दुसऱ्या भागात हृतिक रोशन तर तिसऱ्या भागात आमिर खान दिसला होता. तर आता चौथ्या भागात अक्षय आणि सलमानचं नाव समोर येत आहे. याशिवाय अभिनेता अक्षय कुमारने य़शराज फिल्मच्या ऑफिसमध्ये एक मीटिंग केल्याचही म्हटलं जात आहे. ट्वीटर वर काही फॅन्सनी ‘धूम 4’ (Dhoom 4) चे पोस्टर पोस्ट केले आहेत. तर सलमान आणि अक्षय हे अँक्शन सीन्समध्ये दिसत आहेत. अनेक ट्वीट्स नंतर आता ‘धूम 4’ मध्ये खरचं अक्षय आणि सलमान दिसणार आहेत का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यशराज फिल्म्सने अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरीही चाहत्यामंध्ये कमालीचा उत्साह या चित्रपटाविषयी दिसत आहे. यानंतर एकामागोमाग अनेक ट्वीट्स (Tweets) येऊ लागले आहेत.

  OTT वर यांचीच दहशत; पाहा वेब सीरिजमधील सर्वात खतरनाक खलनायक

  दरम्यान सलमानच्या हातात आणखी बरेच चित्रपट आहेत व तो त्यातही व्यस्त आहे. ‘टायगर 3’, ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘अंतिम’, ‘डेथ सुल्तान’, असे चित्रपटही तो करत आहे. अक्षय देखील त्याच्या अनेक बिग बजेट चित्रपटांसाठी काम करत आहे. ‘राम सेतू’, ‘पृथ्वीराज’, ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’ या चित्रपटांत तो दिसणार आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Akshay Kumar, Bollywood, Entertainment, Salman khan

  पुढील बातम्या