मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानचं सर्वात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण का अधुरं राहिलं?

सलमान खानचं सर्वात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण का अधुरं राहिलं?

बॉलिवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला कायमचे एकमेकांचे होणार आहेत. बातम्यांनुसार, मित्र सलमान खान देखील कतरिना कैफच्या लग्नाच्या तयारीत मदत करत आहे. लग्नाच्या ठिकाणाची सुरक्षा सलमान खानचा अंगरक्षक शेरा याने केली आहे. पण, सलमानचे चाहते मात्र काहीसे नाराज आहेत.

बॉलिवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला कायमचे एकमेकांचे होणार आहेत. बातम्यांनुसार, मित्र सलमान खान देखील कतरिना कैफच्या लग्नाच्या तयारीत मदत करत आहे. लग्नाच्या ठिकाणाची सुरक्षा सलमान खानचा अंगरक्षक शेरा याने केली आहे. पण, सलमानचे चाहते मात्र काहीसे नाराज आहेत.

बॉलिवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबरला कायमचे एकमेकांचे होणार आहेत. बातम्यांनुसार, मित्र सलमान खान देखील कतरिना कैफच्या लग्नाच्या तयारीत मदत करत आहे. लग्नाच्या ठिकाणाची सुरक्षा सलमान खानचा अंगरक्षक शेरा याने केली आहे. पण, सलमानचे चाहते मात्र काहीसे नाराज आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 7 डिसेंबर : बॉलिवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सर्वत्र या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. लग्नाच्या तयारीचे अपडेट्सही सातत्याने समोर येत आहेत. 9 डिसेंबरला दोघेही कायमचे एकमेकांचे होणार आहेत. बातम्यांनुसार, मित्र सलमान खान देखील कतरिना कैफच्या लग्नाच्या तयारीत मदत करत आहे. लग्नाच्या ठिकाणाची सुरक्षा सलमान खानचा अंगरक्षक शेरा याने केली आहे. असे असताना सलमानचे चाहते मात्र काहीसे नाराज आहेत. कतरिना कैफनेही भाईला सोडलं अशी त्यांची भावना आहे. मात्र, सलमानचं हे काही पहिलं प्रेम नाही. सलमानचं सर्वात जास्त गाजलेलं प्रेम प्रकरण ऐश्वर्या रायसोबत होती. पण, हे दोघं का वेगळे झाले याची माहितीय का?

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी माहीत असा व्यक्ती कदाचित सापडणार नाही. या लव्ह स्टोरीचा नायक सलमान खान प्रेमाच्या आगीत इतका पेटून उठला की खलनायक बनला. ही गोष्ट आहे एका आशिकाची, त्यानं केलेल्या जीवापाड प्रेमाची. तो प्रेमात काहीही करायला तयार होता. पण आपल्या असंख्य चुकांनी प्रेमाचं सुंदर नातंच त्याच्यापासून दूर गेलं. एक प्रेमकहाणी, जी राहिली अधुरी.

ऐश्वर्यामुळं आमच्या नात्यात दुरावा आला : सोमी अली

सलमान-ऐश्वर्याची प्रेमकहाणी 1997 मध्ये सुरू झाली. सलमान त्यावेळी सुपरस्टार बनला होता. तर ऐश्वर्यानं मिस वर्ल्डचा मुकूट डोक्यावर चढवला होता. त्यानंतर तिचं बॉलिवूडमध्ये पदार्पण झालं. त्याकाळात सलमानचं हृदय धडकत होतं ते सोमी अलीसाठी. त्यावेळी सलमान सोमीबद्दल सीरियस होता. तिच्याशी लग्नही करणार होता. पण त्याच वेळी सलमानची नजर ऐश्वर्यावर पडली. सलमान कधी अॅशच्या प्रेमात पडला हे त्याला कळलंच नाही. सोमी अलीनं एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की सलमान आणि तिचं नातं तुटलं ते ऐश्वर्यामुळे. सोमी अली परदेशातच निघून गेली. सलमाननं मन्सुर अलीचा जोश सिनेमा नाकारला. कारण त्या सिनेमात त्याला ऐश्वर्याच्या भावाची व्यक्तिरेखा साकारायची होती.

सलमानची ऐश्वर्याला मदत

ऐश्वर्याचं करियर घडवण्यात सलमानचा सिंहाचा वाटा आहे, असं म्हणतात. त्याने अनेक निर्मात्यांकडे तिच्यासाठी शब्द टाकला होता. ऐश्वर्याला हम दिल दे चुके सनम हा चित्रपट मिळवण्यामागे सलमानचाच हात असल्याचे सांगितले जाते. सलमानचा मित्र संजय लीला भन्साळीनं अॅशला ब्रेक दिला. सिनेमाच्या शूटिंगवेळी या दोघांची जवळीक आणखी वाढली. ते ऐकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्याचं हे प्रेम पडद्यावरही पहायला मिळत होतं.

सलमानचे मित्र म्हणायचे भाभी

ऐश्वर्या हळूहळू सलमानच्या आयुष्यात आली. त्याच्या कुटुंबाच्याही जवळ आली. सलमानचे मित्र तिला भाभी म्हणून हाक मारू लागले. अनेक मासिकांत असं छापून आलं होतं की ऐश्वर्याच्या आई-वडिलांना हे प्रेम मंजूर नव्हतं. त्यांनी तिला सलमानपासून लांब रहा म्हणून सांगितलं. तेव्हा ऐश्वर्या नाराज होऊन वेगळी राहायला लागली.

Ex Girfriend च्या सुरक्षेसाठी सलमानच आला पुढे; कॅटच्या लग्नात बॉडीगार्ड....

असं तुटलं दोघांचं नातं

एका रात्री सलमान ऐश्वर्याच्या घरी रात्री पोहचला. तिचा दरवाजा ठोकायला लागला. 19व्या मजल्यावरून उडी मारण्याचीही धमकी दिली. यात त्याचा हातही जखमी झाला. शेवटी सकाळी 6 वाजता दरवाजा उघडला. सलमानच्या या हंगाम्यामागे कारण होतं. त्याला ऐश्वर्याशी लग्न करायचं होतं. पण ऐश्वर्या यशाची शिडी चढत होती. तिला त्यावेळी लग्नबंधनात अडकायचं नव्हतं. या घटनेबद्दल एका मासिकाला इंटरव्ह्यू देताना सलमाननं तो अॅशच्या घरी गेल्याचं कबूल केलं होतं.

त्यानंतर ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमानविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. सलमानची अब्रूच गेली. हळूहळू सलमान-ऐश्वर्यामध्ये दुरावा वाढत गेला. त्याच काळात अमेरिकेत गेलेल्या सोमी अलीनं सलमानला फोन करून वडिलांच्या ऑपरेशनसाठी मदत मागितली. तेव्हा सलमान अॅशला न सांगता अमेरिकेला गेला. ती चिडली आणि तेव्हाच तिनं नातं संपवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कुछ ना कहोच्या सेटवर सलमाननं जाऊन प्रचंड तमाशा केला. त्या सिनेमात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन होते. असं म्हणतात, सलमाननं अभिषेकच्या कारचीही तोडफोड केली. त्यादरम्यान 2002 मध्ये ऐश्वर्या एका अॅवॉर्ड फंक्शनमध्ये गेली होती. तेव्हा तिचा हात फॅक्चर होता. काही वर्षांनी एका मासिकाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अॅशनं सलमाननं मारलं असल्याचं सांगितलं. ती हेही म्हणाली की सलमानचा फोन उचलला नाही तर तो भांडायचा. शेवटी एका सुंदर लव्ह स्टोरीचा अंत झाला.

First published:

Tags: Katrina kaif, Salman khan, Vicky kaushal