सलमान खानच्या हिरोईनवर आली दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी करायची वेळ!

सलमान खानच्या हिरोईनवर आली दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी करायची वेळ!

पूजानं दोन दशकांपूर्वी सलमान खानच्या 'वीरगति' या सिनेमात काम केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : जवळापास 2 दशकांपूर्वी बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा डडवाल पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपलं नशीब आजमावू पाहत आहे. पण पैशांची चणचण असल्यानं नाइलाजानं ती सध्या वर्सोवामधील एका चाळीत राहत आहे. पूजाला एका कुटुंबानं त्यांच्या घरात राहायला जागा दिली आहे आणि त्याच्या बदल्यात ती त्यांच्या घरातली भांडी घासणं, कपडे धुणं यासारखी लहान-मोठी काम करुन त्यांना मदत करत आहेत. एकेकाळी सलमान खानच्या सिनेमा मुख्य भूमिकेत दिसलेल्या पूजावर खूपच हलाखीची वेळ आली आहे.

पूजानं दोन दशकांपूर्वी सलमान खानच्या 'वीरगति' या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. दरम्यान तिला टीबी झाला. पण त्यावेळी तिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. याची माहिती सलमानला मिळाल्यावर त्यानं तिची मदतही केली होती. आता या आजापणातून सावरल्यावर पूजा पुन्हा एकदा नव्यानं जीवनाची सुरुवात करु इच्छिते. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि यात सलमाननं तिची मदत करावी अशी तिची इच्छा आहे.

सलमान खानच्या गाण्यावर कपलनं शेतात केला डान्स, पाहा VIRAL VIDEO

पूजाची तब्येत ठीक झाली असली आणि ती आजारपणातून बाहेर पडली असली तरीही तिची आर्थिक परिस्थिती मात्र सुधारलेली नाही. पूजाची परिस्थिती समजून घेतल्यानंतर समजून घेतल्यानंतर अभिनेत्री सोहा अली खाननं सध्याच्या नवोदित कलाकारांना अभिनया व्यतिरिक्त उपजिविकेचा दुसरा पर्याय शोधून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि यासाठी तुम्ही या क्षेत्रात येण्याआधी तुमचं शिक्षण पूर्ण करयला हवं असं तिनं म्हटलं आहे.

OMG! राहुल बोसनंतर आणखी एका सेलिब्रेटीला 5 स्टार हॉटेलचा झटका

अभिनेत्री म्हणून यशस्वी होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आलेल्या पूजाच्या करिअरची सुरुवात खूपच चांगली राहिली. पण नंतर सिनेमा किंवा टीव्ही मालिकांमध्ये म्हणावं तसं यश न मिळाल्यानं तिला हे क्षेत्र सोडावं लागलं. पण तिच्या समस्या इथंवरच संपल्या नाहीत. तिच्या या कठीण काळात तिच्या कुटुंबानंही तिची साथ सोडली. त्यामुळे आता पूजाला सलमान खान कडून अपेक्षा आहे की तो तिला मदत नक्की करेल.

पूजाचं म्हणणं आहे की, तिच्या स्वप्नांप्रमाणं तिच्या कुटुंबानंही तिची साथ सोडली. पण या सर्वांत सलमान खान मात्र देवाप्रमाणे तिच्या मदतीसाठी धावून आला. सलमानच्या टीमनं फक्त तिच्या आजारपणाचा खर्चच केला नाहीतर त्यांनी तिची काळजीही घेतली. तिला फक्त याच गोष्टीचं दुःख आहे ती या सगळ्याबद्दल सलमानचे आभार मानू शकली नाही.

पूजा सांगते, जर भविष्यात मी कधी स्वतःचं घर घेऊ शकले तर देवासारखा सलमानचा फोटो घरात ठेवेन. मी जेव्हा लोकांच्या घरी काम करते त्यावेळी अनेकदा मला डिप्रेशन येतं. आत्महत्या करावीशी वाटते. पण मला या सर्वातून बाहेर पडायचं आहे. पुन्हा टीव्ही किंवा सिनेमात काम करून माझं मानानं जीवन जगायचं आहे. मला वाटतं की सलमाननं मला यातून बाहेर पडायला मदत करावी.

पूजानं सलमानसोबत ‘वीरगति’ या सिनेमा व्यतिरिक्त रवि किशनसोबत 'सिंदूर की सौगंध' आणि 'इन्तक़ाम' या सिनेमांमध्ये काम केलं आहे टीव्ही मालिकांमध्येही दिसलेली ही अभिनेत्री अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आली आहे. सध्या ती मुंबईतील एका कुटुंबाकडे आश्रयाला असून त्यांच्याच घरात काम करुन स्वतःचं पोट भरत आहे. त्यामुळे आता तिला पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते का? आणि अशी संधी मिळाल्यास ती तिची स्वप्न पूर्ण करणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

'या' कारणासाठी मलायकाशी लग्न करण्याचं टाळतोय अर्जुन कपूर?

============================================================

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 04:09 PM IST

ताज्या बातम्या