मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शिल्पा-कतरिनाचा डान्स पाहताना सलमानला लागली झोप, पुढे काय झालं पाहा VIDEO

शिल्पा-कतरिनाचा डान्स पाहताना सलमानला लागली झोप, पुढे काय झालं पाहा VIDEO

एका व्हिडीओमध्ये शिल्पा आणि कतरिनाचा डान्स पाहता पाहता सलमान झोपलेला दिसत आहे.

एका व्हिडीओमध्ये शिल्पा आणि कतरिनाचा डान्स पाहता पाहता सलमान झोपलेला दिसत आहे.

एका व्हिडीओमध्ये शिल्पा आणि कतरिनाचा डान्स पाहता पाहता सलमान झोपलेला दिसत आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 14 मे : बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. सध्या तर तो कोरोनाग्रस्तांना मदत करत असल्यानं नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये सुद्धा तो सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. अशात त्याचे काही थ्रोबॅक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अशाच एका व्हिडीओमध्ये शिल्पा आणि कतरिनाचा डान्स पाहता पाहता सलमान झोपलेला दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका डान्स रिअलिटी शोमधील आहे. ज्यात मागच्या वर्षी शिल्पा शेट्टी जज म्हणून काम पाहत होती. या व्हिडिओमध्ये करिना कैफ आणि शिल्पा शेट्टी सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील गाणं 'एथे आ..' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या दोघींना डान्स करताना पाहून सलमान झोपण्याचं नाटक करतो आणि मग डान्स संपल्यावर त्याला जज गीता त्याला उठवते. सलमान उठतो आणि त्यांच्या डान्सवर बकवास अशी कमेंट करतो. ज्यावर सर्वजण हसू लागतात.
हा व्हिडीओ सलमान खानच्या 'भारत' सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळचा आहे. जेव्हा सलमान त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी इंडियाज सुपर डान्सरच्या मंचावर पोहोचला होता. त्यावेळी शिल्पा आणि कतरिनानं या सिनेमातील गाण्यावर धम्माल डान्स केला होता. हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रत्यक्षात या दोघीही सलमानच्या खूप जवळच्या मैत्रीणी आहेत.
First published:

Tags: Bollywood, Salman khan

पुढील बातम्या