S M L

सलमाननं बहिणीसाठी 'असा' निवडला नवरा

सलमान खानची बहीण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. त्याचा लव्हरात्री सिनेमा 5 आॅक्टोबरला रिलीज होतोय.

Updated On: Aug 25, 2018 10:38 AM IST

सलमाननं बहिणीसाठी 'असा' निवडला नवरा

मुंबई, 25 आॅगस्ट : सलमान खानची बहीण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. त्याचा लव्हरात्री सिनेमा 5 आॅक्टोबरला रिलीज होतोय. त्यानिमित्तानं आयुषनं सलमानचा एक किस्सा सांगितला. आयुष आणि अर्पिता कसे भेटले, सलमाननं आपल्या बहिणीच्या नवऱ्याची पारख कशी केली, असे प्रश्न अनेकांना पडलेत. त्याचं उत्तर खुद्द आयुष शर्मानंच दिलंय.

त्याची आणि सलमानची पहिली भेट ही एखाद्या सिनेमाच्या सीनसारखीच होती असं त्याने स्पष्ट केलंय. जेव्हा तो अर्पिताचा हात मागण्यासाठी सलमानला भेटला तेव्हा सलमान प्यार किया तो डरना क्या या सिनेमातल्या सीनप्रमाणे मला फिरायला घेऊन गेला होता. तिथे त्याने त्याला काही प्रश्न विचारले त्याची समाधानकारक उत्तरं मिळाल्यानंतरच त्याने अर्पिता आयुषच्या लग्नाला होकार दिला होता.

सलमाननं त्याला विचारलं, एवढ्या कमी वयात तुला लग्न का करायचंय? तू तुझ्या भविष्याचा कसा विचार करतोस? आता याची उत्तरं आयुषनं काय दिली हे गुलदस्त्यातच आहे. पण सलमानची पसंती मिळाली म्हणजे आयुषनं योग्य उत्तरंच दिली असावीत.

सलमान खानच्या 'लवरात्री' या चित्रपटातील एक नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं सलमानने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे. या चित्रपटात तुम्हाला एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. आयुष शर्मा आणि वरीना हुसेन. 'अंख लड जावे' असं या गाण्याचं नाव असून हे एक पार्टी साँग आहे. त्याचबरोबर तुम्हाला बादशाहचं रॅप आणि जुबिन नौटियालाचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

Loading...

सलमानने हे गाणं शेअर करून असं म्हटलं आहे की, पाहा, ऐका आणि सांगा कसं वाटलं.

VIDEO : आय लव्ह इंडिया,पण माझा संघ इराण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2018 10:38 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close