मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Happy Birthday: सलमान खानसाठी आजही अविवाहित राहिली ही पाकिस्तानी अभिनेत्री

Happy Birthday: सलमान खानसाठी आजही अविवाहित राहिली ही पाकिस्तानी अभिनेत्री

सलमान खान (Salman Khan) आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), कतरिना कैफप्रमाणेच (Katrina Kaif) सलमान आणखी एका अभिनेत्रीसोबत तब्बल 8 वर्ष रिलेशनशीपमध्ये होता. आजही त्या अभिनेत्रीने लग्न केलं नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 27 डिसेंबर: बॉलिवूडमधील सल्लूमियाँ, भाईजान सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस. 27 डिसेंबर 1965 साली त्याचा जन्म झाला. सलमान आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं त्याच्या चित्रपटांएवढंच त्याचं खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं. सर्वात जास्त चर्चा झाली ती, सलमान लग्न कधी करणार या प्रश्नाची. सलमान खान आजही अविवाहित आहे. त्याच्या प्रेमप्रकरणांची चर्चा प्रचंड रंगली होती. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), कतरिना कैफ (Katrina Kaif) अशा बॉलिवूडमधील अनेक सुंदर अभिनेत्रींशी त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. सलमानच्या प्रेमात एक अभिनेत्री मात्र एवढी वेडी झाली होती. की, तिने त्याच्याशी लग्न करता यावं म्हणून परदेशातून येऊन चक्क बॉलिवूड गाठलं. सोमी अली (Soma Ali) असं या अभिनेत्रीचं नावं आहे. सोमा मुळची पाकिस्तानची. सोमीचे वडील पाकिस्तानचे तर आई इराकची होती. लहानपणी तिचं शिक्षण पाकिस्तानात झालं त्यानंतर ती आपल्या आई वडिलांसह फ्लोलिडाला रहायला गेली. तारुण्यात प्रवेश करतानाच तिने सिनेमातच सलमान खानला पाहिलं आणि त्याच्याशीच लग्न करण्याचा इरादा पक्का केला. त्याच्यासाठी तिने चक्क बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, मॉडलिंगही केलं.
View this post on Instagram

A post shared by @bollyfusion_

अवघी 16 वर्षांची असताना ती मुंबईत पोहोचली. सलमान खानच्या 'मैनें प्यार किया' या चित्रपटातील अभिनयामुळे ती सलमानवर भारावून गेली होती. मुंबईत दाखल झाल्यानंतर प्रचंड कष्ट करुन तिने एका बॉलिवूडमधील सिनेमामध्ये काम मिळवलं आणि अखेर तो दिवस आलाच जेव्हा तिची आणि सलमान खानची भेट झाली. या भेटीमुळे सोमा अतिशय भारावून गेली होती.
सलमान खान आणि सोमी अली रिलेशनशीपमध्ये आले. जवळजवळ 8 वर्ष ते दोघंही रिलेशनशीपमध्ये होते. तो काळ होता, 1991 ते  1997 चा. त्यांनंतर मात्र ते दोघंही वेगळे झाले आणि त्यांच्या ब्रेकअपचं कारण ठरली ऐश्वर्या. सोमी सलमानपासून वेगळी झाल्यानंतर काही काळातच तिने बॉलिवूडलाही रामराम ठोकला. पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा अमेरिकेत निघून गेली. सलमान आणि सोमी आता एकत्र नसले तरीही ती अजूनही अविवाहित आहे. ते दोघं आपआपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. पण तिने अजूनही लग्न केलं नाही.
First published:

पुढील बातम्या