News18 Lokmat

विराट-अनुष्काच्या लग्नाला सलमानला आमंत्रणच नाही!

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं बहुचर्चित लग्न इटलीला होणार हे आता नक्की. कसं होतंय त्यांचं लग्न? आणि कोणाकोणाला आमंत्रण आहे?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2017 06:17 PM IST

विराट-अनुष्काच्या लग्नाला सलमानला आमंत्रणच नाही!

11 डिसेंबर : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं बहुचर्चित लग्न इटलीला होणार हे आता नक्की. कसं होतंय त्यांचं लग्न? आणि कोणाकोणाला आमंत्रण आहे? बाॅलिवूडमध्ये आमिर खानला पत्रिका पाठवलीय. शाहरूखला पत्रिका मिळाली की नाही हे अजूनन कळलं नाहीय. पण सलमान खानला आमंत्रण नाही. खरं तर सुलतानमध्ये अनुष्कानं त्याच्या बरोबर काम केलंय. त्याच वेळी विराट-अनुष्कामध्ये तणाव निर्माण झाला होता. तो दूर करायला सलमाननंच मदत केली होती. त्यामुळे सलमानला आमंत्रण कसं नाही, याची चर्चा सुरू आहे.

बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये होणार लग्न

हे हाॅटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडतं हाॅटेल. जगातल्या 20 महागड्या हाॅटेल्सपैकी ते एक आहे.

फक्त 44 लोकांची राहण्याची व्यवस्था

या रिसाॅर्टमध्ये 22 रुम्स आहेत. त्यात 44 लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. म्हणून कमी लोकांना आमंत्रण आहे. रोमहून अडीच तास ड्राइव्ह करून हाॅटेलवर जाता येतं.

Loading...

या क्रिकेटर्सना आमंत्रण

सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगला आमंत्रण आहे. महेंद्रसिंग धोनीला अजून आमंत्रण नाहीय.

लग्नाचं रिसेप्शन भारतात होणारेय. त्यावेळी बाॅलिवूड आणि क्रिकेट जगतातले स्टार्स उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...