सलीम खान ठेवणार आता सलमानाचा 'हिशोब'

सलीम खान ठेवणार आता सलमानाचा 'हिशोब'

सलमान खानचे पिता सलीम खान यांनी आता सलमानचा व्यवसाय सांभळण्याची जबाबदारी घेतली आहे.

  • Share this:

25 नोव्हेंबर : दबंग खान अर्थात सलमान खानचे पिता सलीम खान यांनी आता सलमानचा व्यवसाय सांभळण्याची जबाबदारी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सलमानने त्याचा सगळा व्यवहार, हिसाब-किताब आता त्याच्या वडिलांच्या हाती दिला आहे.

एका वेबसाईटच्या माहितीनुसार, सलमानच्या जवळच्या मित्राने सांगितलं की, 'यात आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. सलमान खान असंही त्यांच्या वडिलांच्या परवानगीशिवाय पैसे खर्च करत नाही. पण तरीही यापुढचा सगळा व्यवहार आता सलीम खान सांभाळतील.'

सलीम यांना व्यवहाराचं उत्तम ज्ञान आहे. त्यांच्याकडे चांगलं लिखाण आहे. स्क्रिप्ट वाचताच त्यांच्या लक्षात येतं की, हा प्रोजेक्ट किता चालणार. त्यामुळे सलमानचा कोणता प्रोजेक्ट करायला पाहिजे हे यापुढे ते ठरवतील.

नुकतच अर्पिता आणि त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या घरी पार्टी झाली. या पार्टीत सलमाननं गाणं गाऊन आई-वडिलांना छान गिफ्ट दिलं. तो व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 05:06 PM IST

ताज्या बातम्या