Home /News /entertainment /

मनावर ताण कोणाचा? मी नि:शब्द झालोय; शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर सलील कुलकर्णींची पोस्ट

मनावर ताण कोणाचा? मी नि:शब्द झालोय; शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर सलील कुलकर्णींची पोस्ट

शीतल आमटे (Sheetal Amte) यांच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. गायक सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांनी एका फेसबुक पोस्टमधून आपं दु:ख व्यक्त केलं आहे.

    मुंबई, 01 डिसेंबर: ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ. शीतल आमटे (dr sheetal amte) यांच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर अनेकांना धक्का बसला आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून शीतल आमटे यांनी जीवन यात्रा संपवली आहे. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.  मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. शीतल आमटे यांचे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची चांगले संबंध होते. त्यांच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. गायक आणि संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांनीही शीतल यांच्या निधनाचं दु:ख एका फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केलं आहे. सलील कुलकर्णी यांनी लिहीलं आहे की, ‘ताण...मनावर...कोणाचा? परिस्थितीचा? माध्यमांचा? चर्चेचा? एक बुद्धीमान मैत्रिण हकनाक गेली... नि:शब्द झालोय...शीतल आमटे का गं?’ कोण होत्या शीतल आमटे? डॉ. शीतल आमटे या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या.  2003 मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं.  त्या एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा होत्या. जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे 'यंग ग्लोबल लीडर 2016' साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शीतल आमटे यांनी कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा जोपासण्यासाठी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला होता.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Facebook

    पुढील बातम्या