S M L

सलील कुलकर्णींची आता नवी इनिंग

आता चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सलील कुलकर्णी आपल्यासमोर येत आहेत.

Updated On: Sep 11, 2018 05:16 PM IST

सलील कुलकर्णींची आता नवी इनिंग

नीलिमा कुलकर्णी, मुंबई, 11 सप्टेंबर : गेली जवळजवळ वीस वर्ष सलील कुलकर्णी आपल्याला विविध माध्यमातून भेटत  आहेत , प्रत्येक मराठी घरात आणि मनात पोचलेलं हे नाव आता एका वेगळ्या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहे .

लेखक म्हणून लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी ही दोन अतिशय यशस्वी पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या विकल्या जात आहेत.  त्याचप्रमाणे, स्तंभलेखन आणि झी मराठीवरील 'मधली सुट्टी' या कार्यक्रमांत त्यांनी लिहिलेल्या गोष्टी सुद्धा रसिकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. आता चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक म्हणून सलील कुलकर्णी आपल्यासमोर येत आहेत.

ऑक्टोबरपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होत आहे. 'वेडिंगचा शिनेमा'  हे या चित्रपटाचं शीर्षक आहे . २०१९ मध्ये हा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे. सलील कुलकर्णी म्हणाले, ' चित्रपटाचं दिग्दर्शन ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असल्याने त्या फॉर्मचा अभ्यास केला. आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी आणि असलेली पात्र अशी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटामधून मी मांडत आहे. लेखनही अशाच पद्धतीने केले आहे की सगळ्यांना ती स्वत:ची गोष्ट वाटेल आणि प्रत्येक जण त्याच्याशी रिलेट होईल. ही कथा ज्यांना ज्यांना ऐकवली त्यांच्या ती पसंतीस उतरली.'

अनेक दिग्दर्शकांबरोबर त्यांच्या सिनेमांसाठी काम केलंय, त्याचा फायदा नक्कीच झाला. ते म्हणाले, गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जे काही केले ते नक्कीच वेगळे केले.अगदी बालगीतांपासून,अभंग आणि अभिजात कवितांपासून लावणीपर्यंत सर्व प्रकारची गाणी रसिकांना दिली आणि त्यांनीही त्या सर्वच गीतांना भरभरून प्रतिसाद दिला. आता आणखी एक नवी वाट चोखाळत आहे. गेल्या दोन वर्षामध्ये म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं असल्यामुळे  कॅमेरा,एडिटिंग, ट्रॉलीचा वापर याची थोडीफार जाण होतीच पण चित्रपटाचे दिग्दर्शन ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असल्याने त्या फॉर्मचा अभ्यास केला.

सलील कुलकर्णीची प्रत्येक कलाकृती लोकप्रिय ठरलीय. त्यामुळे सिनेमाबद्दल अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 05:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close