मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बाप रे बाप! दुबईत सलमानची 17 वर्षांची मुलगी आणि पत्नी? स्वतः सल्लूनं दिलं उत्तर

बाप रे बाप! दुबईत सलमानची 17 वर्षांची मुलगी आणि पत्नी? स्वतः सल्लूनं दिलं उत्तर

सलमानला दुबईमध्ये 17 वर्षांची मुलगी आणि पत्नी आहेत का? असा सवाल केला यावर सलमाननं स्वतः उत्तर दिलं आहे.

सलमानला दुबईमध्ये 17 वर्षांची मुलगी आणि पत्नी आहेत का? असा सवाल केला यावर सलमाननं स्वतः उत्तर दिलं आहे.

सलमानला दुबईमध्ये 17 वर्षांची मुलगी आणि पत्नी आहेत का? असा सवाल केला यावर सलमाननं स्वतः उत्तर दिलं आहे.

मुंबई, 21 जुलै: बॉलिवूड (Bollywood) म्हंटलं की 'खान' (Khan) नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यातील Most Wanted खान म्हणजे आपला सल्लू भाई (Salman Khan). सलमान खान आपल्या बॉडीमुळे किंवा आपल्या दातृत्वामुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलीवूडचा मोस्ट वॉन्टेड बॅचलर (Most wanted Bachelor) अशीही त्याची ओळख आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान (Actor salman khan) खान बुधवारी आपला भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) टॉक शो ‘पिंच’ (The Pinch) या सीझन दोनच्या प्रीमियरमध्ये आला होता. यावेळी सलमानला दुबईमध्ये 17 वर्षांची मुलगी आणि पत्नी आहेत का? (Salman Khan family in Dubai) असा सवाल  केला यावर सलमाननं स्वतः उत्तर दिलं आहे.

सलमान काही  गोष्टींमुळे सतत सोशल मीडियावर (Social media) ट्रॉल होत असतो. ट्रॉल करणारे त्याला नाही नाही ते प्रश्न विचारतात आणि आरोप करतात. त्यातच सलमानची दुबईमध्ये पत्नी आहे आणि त्याला 17 वर्षांची मुलगीही आहे असे आरोप काही फॅन्सकडून केले जातात. याचाच खुलासा करण्यासाठी या शोच्या फॉर्मेटनुसार सोशल मीडियावर केलेल्या ट्वीटच्या जोरावर अरबाज शोच्या पाहुण्याला प्रश्न विचारतो.यात सलमानला हा प्रश्न विचारण्यात आला.

गेल्या वर्षी एका यूजरनं असा दावा केला होता की, दुबईमध्ये (Dubai) सलमान खानचं एक गुप्त कुटुंब आहे, ज्यात त्याला पत्नीसह 17 वर्षांची मुलगी आहे. भारतातील प्रत्येकाला हे माहित आहे की सलमान आपली पत्नी नूर आणि 17 वर्षाची मुलगी यांच्यासह दुबईत असतो. तो किती काळ भारतीय जनतेला फसवणार? अशी ही पोस्ट होतो. याबद्दल सलमानला अरबाजनं विचारलं.

हे वाचा - राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीला झटका; Super Dancer Chapter 4 बाबत घेतला निर्णय

काय म्हणाला सलमान

प्रथम हे ऐकून सलमान आश्चर्यचकित झाला आणि नंतर अरबाजला हे कोणासाठी विचारलं आहे? असं विचारलं. त्याला उत्तर देताना अरबाज म्हणाला की ही टिप्पणी फक्त तुझ्यासाठीच करण्यात आली आहे. यावर सलमान म्हणाला मी या माणसाला इथे अगदी उत्तर देईन की भाऊ, मला बायको नाही. वयाच्या 9 व्या वर्षापासून मी भारतात गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये रहात आहे मी कोठे राहतो हे संपूर्ण जगाला माहित आहे.

सोशल मीडियावरील कमेंट पॉझिटिव्ह

शोवर बोलताना अरबाज खानने कबूल केलं की सोशल मीडियावरील बर्‍याच कमेंट्स सकारात्मक असतात आणि त्यांनी नवनवीन काम करण्याची प्रेरणा मिळते. सलमाननं अशा यूज़र्सकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला मात्र आता एपिसोड आणि याबाबतच्या चर्चा सुरूच राहणार एवढं मात्र नक्की.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Salman khan