अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई

अभिनेत्री साक्षी तन्वर झाली आई

छोट्या पडद्यावर कधी मालिकेतून, तर कधी जाहिरातीतून तिनं आईच साकारलीय. आणि आता खऱ्या आयुष्यातही साक्षी आई बनलीय.

  • Share this:

मुंबई, 21 आॅक्टोबर : अभिनेत्री साक्षी तन्वरला आतापर्यंत आपण अनेक भूमिकांमध्ये पाहिलंय. अगदी घर घर की कहानी ते बडे अच्छे लगते है मालिकांपर्यंत ती लोकप्रियच राहिली. छोट्या पडद्यावर कधी मालिकेतून, तर कधी जाहिरातीतून तिनं आईच साकारलीय. आणि आता खऱ्या आयुष्यातही साक्षी आई बनलीय.

साक्षी तन्वरच्या घरी आता बोबडे बोल ऐकायला मिळणार आहेत. चिमुकली पावलं दुडूदुडू धावणार आहेत. हे कसं शक्य झालं? साक्षीचं तर अजून लग्न झालेलं नाहीय.

साक्षी तन्वरनं एक मुलगी दत्तक घेतलीय. तिचं नाव ठेवलंय द्वित्या. टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना साक्षी म्हणाली, ' माझे आईवडील आणि कुटुंब यांच्या सहकार्यानं हे शक्य झालं. माझ्या आयुष्यात हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. मुलीचं नाव द्वित्या. याचा अर्थ लक्ष्मी आहे.' द्वित्या आता 9 महिन्यांची होईल.

आतापर्यंत रवीना टंडन, सुश्मिता सेन, सनी लिओन, नीलम यांनीही मुली दत्तक घेतल्यात. त्या यादीत आता साक्षीचं नाव आलंय. साक्षी दंगल सिनेमात आमिरसोबत होती. त्यात ती चार जणांची आई बनलीय.

नुकताच सनी लिओननंही दत्तक घेतलेल्या मुलीचा वाढदिवस जोरदार साजरा केला. सध्या सनी लिओनी आणि डॅनिल वेबर हे कुटुंबासोबत मॅस्किकोमध्ये सुट्टी साजरा करत आहेत. सोमवारी सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मुलीसोबतच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले. ज्यात सनी खूप आनंदी दिसत आहे.

याशिवाय सनी आणि पती डॅनियलच्या घरी गोंडस जुळ्या मुलांचा जन्म झालाय. नोआ आणि अॅशर अशी या जुळ्या मुलांची नाव असून सरोगसी द्वारे त्यांचा जन्म झालाय असं समजतंय. या आधी सनी आणि डॅनियल यांनी निशा या त्यांच्या मुलीला भारतातून दत्तक घेतलंय.

सेलिब्रिटी मुली दत्तक घेऊन नवा चांगला पायंडा पाडतायत.

अशी घडली शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची ऐतिहासिक भेट

First Published: Oct 21, 2018 11:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading