Home /News /entertainment /

सलमानने अजून लग्न का नाही केलं? साजिद नाडियाडवालाने पहिल्यांदा सांगितलं खरं कारण

सलमानने अजून लग्न का नाही केलं? साजिद नाडियाडवालाने पहिल्यांदा सांगितलं खरं कारण

सलमान खानचं लग्न कधी होणार या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच हवं आहे. याचं प्रश्नावर पडदा टाकत साजिद नाडियाडवालाने मोठा खुलासा केला आहे. सलमानचं एकेकाळी लग्न ठरलं होतं, निमंत्रण पत्रिकाही छापून आलेल्या पण असं काय झालं ज्याने तो अजूनही अविवाहित आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 17 मे: सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या लग्नाच्या मुद्द्यावरून (Salman Khan Marriage) कायमच चर्चेत राहिला आहे. सलमानचं लग्न कधी होणार याची उत्सुकता अनेक वर्ष त्याचे चाहतेच नाही तर सगळ्यांनाच लागून राहिली आहे. आपल्या लग्नाबद्दल सलमानला अनेक पत्रकार परिषदेत प्रश्न करण्यात आले आहेत. तेव्हा प्रत्येकवेळी गोल गोल उत्तरं देऊन सलमान या गुपितांची उत्सुकता आणखीनच वाढवतो. पण एक काळ असा होता जेव्हा सलमानचं खरंच लग्न ठरलं होतं. सलमानच्या लग्नाची सगळी व्यवस्था झाली होती. त्याच्या लग्नाची पत्रिका सुद्धा छापून आली होती पण लग्नाच्या साधारण एक आठवड्याआधी सलमानने लग्नाला नकार दिला. साजिद नाडियादवालाने काही वर्षांपूर्वी याबद्दल खुलासा सुद्धा केला होता. एका मुलाखतीत सांगताना साजिदने असं स्पष्ट केलं की सलमान आणि स्वतः साजिद एकाच दिवशी लग्न करणार होते. साजिदने नेमकं काय सांगितलं? कपिल शर्मा शो मध्ये 2019 साली साजिद नाडियादवालाने हजेरी लावली होती. त्यावेळी साजिदने खुलासा केला की त्याने आणि सलमान एकाच दिवशी लग्न करायचा निर्णय घेतला होता.

  पाहा फोटो - नवऱ्यासोबत फोटो का नाही पोस्ट करत? चाहत्यांच्या प्रश्नावर सोनाली कुलकर्णीनं दिलं हे उत्तर

  तो असं सांगतो- "सलमानच्या आयुष्यात तेव्हा एक मुलगी होती. मला स्वतःच्या लग्नासाठी मुलगी शोधणं आवश्यक होतं. मी माझ्या आईला आणि घरच्यांना माझ्यासाठी मुलगी शोधायला सांगितलं आणि हे ही स्पष्ट केलं की सलमान आणि मी एकाच दिवशी लग्न करायचं ठरवलं आहे. सलमानचे वडील सलीम साहेब यांच्या वाढदिवशी अर्थात 18 नोव्हेंबरला आम्ही विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता." मग नक्की झालं काय? लग्नाची सगळी तयारी झालेली असताना सलमानने लग्नाला नकार का दिला आणि तो अजूनही अविवाहित का आहे? साजिद पुढे असं सांगतो, "लग्नाच्या ठीक 5-6 दिवस आधी सलमानने सांगितलं की 'माझा मूड नाहीये.' त्याचा निर्णय बदलण्यात तो यशस्वी झाला. माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा त्याने माझ्या कानात येऊन सांगितलं 'बाहेर एक गाडी उभी आहे, तू ही तुझं मत बदल आणि पळून जा.' सलमानने स्वतः एका मुलाखतीत हा खुलासा केलेला की तो संगीता बिजलानीशी विवाहबद्ध होणार होता. त्यांच्या निमंत्रण पत्रिकादेखील छापून आल्या होत्या. पण काही दिवस आधी त्याने भीतीने लग्नाला नकार दिला.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood actor, Salman khan

  पुढील बातम्या