— Akshay Kumar (@akshaykumar) 12 October 2018दरम्यान, #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पुढे येऊन बोलत आहेत. या सगळ्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी लवकरच एक न्यायिक समिती गठित करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून #MeToo या हॅशटॅगसह अनेक महिलांनी आपलं लैंगिक शोषण किंवा छळ कसा झाला याविषयी पुढे येऊन सांगितलं आहे. या सगळ्या तक्रारींवर आपला विश्वास आहे आणि यावर सुनावणी झालीच पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं मनेका गांधी म्हणाल्या. या संदर्भात जनसुनवाई करण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ, न्यायमूर्ती यांची 4 सदस्यीय समिती नेमण्याची शिफारस मंत्रालयाने केली आहे, असं त्यांनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात आज ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावरच्या या मोहिमेला पाठिंबा देताना राहुल गांधी यांनी लिहिलंय की, सत्य बाहेर आलंच पाहिजे. ते खड्या आवाजात स्पष्टपणे मांडायलाच हवं. स्त्रियांना आदरपूर्वक आणि प्रतिष्ठेची वागणूक मिळायलाच हवी, असंही त्यांनी ट्विटरवर लिहिलंय. #MeToo मोहिमेत आज आणखी काही चित्रपट क्षेत्रातल्या पुरुषांविरोधात महिलांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामध्ये चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई याचं नावही आलं आहे. आमीर खान आणि अक्षय कुमार यांनी स्त्रियांची छळवणूक करणाऱ्या चित्रकर्त्यांबरोबर किंवा सहकलाकारांबरोबर काम न करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Women harasment