News18 Lokmat

'सैराट'मुळे करमाळ्यातील ही ठिकाणं झाली पर्यटन स्थळं !

इनामदार वाडा, भांगे कुटुंबियांचा बंगला...करमाळा पोलीस स्टेशन, एसटी स्टॅन्ड, सातविहीर, अशी यापूर्वी कधीही प्रसिद्धी झोतात न आलेली साधी साधी ठिकाणं सैराटच्या यशामुळे प्रकाश झोतात आली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2017 08:16 PM IST

'सैराट'मुळे करमाळ्यातील ही ठिकाणं झाली पर्यटन स्थळं !

शंकर कांबळे,करमाळा

29 एप्रिल : नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. पण आज वर्षभरानंतरही सैराटविषयीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. विशेषतः या सिनेमात वापरण्यात आलेली करमाळा परिसरातली लोकेशन्सही आजही प्रेक्षणीय स्थळं म्हणून गर्दी खेचत आहेत. आजही सैराटचे चाहते या स्पॉट्सवर जाऊन फोटो काढताहेत.

सैराट....या सिनेमानं अनेकांना एक खास ओळख करून दिली. यामध्ये दिग्दर्शक नागराज, नायिका रिंकू राजगुरू, नायक आकाश ठोसर किंवा सल्या आणि प्रदीप असतील. याचप्रमाणे या सिनेमानं अशा एका अनोळखी निम शहरी गावाला सुद्धा सर्वांच्या समोर आणलं. जे कधीही चर्चेचा विषय नव्हतं. आणि ते शहर म्हणजे करमाळा.

खरंतर सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळेचंच हे मूळगाव..म्हणून त्यानेही या सिनेमाचं बहुतांश चित्रीकरण हे करमाळा आणि आजुबाजुच्या गावांमध्येच केलं. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा करमाळा परिसरही पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आलाय.

सैराटच्या वर्षपूर्तीनिमित्त साधूनही अनेक सैराटप्रेमी या चित्रीकरण स्पॉट्सना आवर्जून भेटी देताहेत...फोटो काढताहेत....इथलं कमलाभवानी मंदीर, मग ती 96 पायऱ्यांची विहीर असेल किंवा ते फांदी तुटलेलं झाड असेल. आजही तिथे जाऊन सेल्फी काढण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही.

Loading...

इनामदार वाडा, भांगे कुटुंबियांचा बंगला...करमाळा पोलीस स्टेशन, एसटी स्टॅन्ड, सातविहीर, अशी यापूर्वी कधीही प्रसिद्धी झोतात न आलेली साधी साधी ठिकाणं सैराटच्या यशामुळे प्रकाश झोतात आली. म्हणूनच तुम्हीही सैराटचे चाहते असाल तर वर्षपूर्तीच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणांना भेट द्या आणि सैराट होण्याचा फिल घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2017 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...