पुन्हा एकदा मानाने झळकायला, ती येतेय तुमची मनं जिंकायला!

पुन्हा एकदा मानाने झळकायला, ती येतेय तुमची मनं जिंकायला!

पोस्टरमध्ये एका बाजूला मिरवणूक, गुलाल आणि राजकीय नेत्यांप्रमाणे नमस्कार करताचे रिंकूचे पोस्टर दिसते.

  • Share this:

मुंबई, ११ मार्च २०१९- 'सैराट' सिनेमामुळे आर्ची-परशा प्रसिद्ध झाले. 'सैराट' सिनेमामुळे एका रात्रीत रिंकू स्टार झाली होती. आजही तिच्या नावाची क्रेझ तसूभरही कमी झाली नाही. आता सर्वांच्य मनावर अधिराज्य करणारी आर्ची अर्थात रिंकू नवी प्रेमकहाणी घेऊन सर्वांच्या भेटीला येत आहे. 'कागर' या सिनेमातून ती नव्या रुपात सर्वांना दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार…'कागर' या ओळीतून रिंकू राजगुरूची ओळख करून देण्यात आली आहे. रिंकूचं हे पोस्टर पाहून सिनेमाबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांनी ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या दोन सिनेमांचं दिग्दर्श केलं आहे. आता ‘कागर’च्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने सिनेमाची निर्मिती केली आहे.

पोस्टरमध्ये एका बाजूला मिरवणूक, गुलाल आणि राजकीय नेत्यांप्रमाणे नमस्कार करताचे रिंकूचे पोस्टर दिसते. यावरून कागर हा सिनेमा नायिकाप्रधान असून रिंकूने यात राजकीय नेत्याची व्यक्तिरेखा साकारल्याचे पोस्टरवरून कळते.

याआधीही कागरचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. यात एका पडद्याआड उभी असलेली रिंकू गहन विचार करताना दिसत आहे. पोस्टरमध्ये पडदा, त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींचा गराडा अन् त्यात रिंकूच्या दिसण्यातला साज... नजरेतील करारीपणा हे एक्स्प्रेशन विलक्षण आहेत. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या पोस्टरमुळे सिनेमाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे. याआधी हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र रिंकूची १२ वी ची परीक्षा असल्यामुळे सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

First published: March 11, 2019, 10:21 PM IST
Tags: Sairat

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading