मुंबई, 20 जुलै- ‘सैराट’ (Sairat) मुळे चाहत्यांच्या मनावर गारुड घातलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू (Rinku Rajguru) राजगुरू होय. चाहत्यांवर आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूची जादू कायम आहे. आजही चाहते रिंकूला तसचं भरभरून प्रेम देत असतात. तसेच तरुणाईमध्येही रिंकूची क्रेझ कायम आहे. रिंकूने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर (Share Video) केला आहे. रिंकूच्या एक्सप्रेशन्सने चाहत्यांना वेड लावलं आहे. ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’ या सदाबहार गाण्यावर रिंकूने हा रील बनवला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री रिंकू राजगुरूला एका रात्रीत स्टारडम मिळालं आहे. आणि ती आत्ता ते टिकवून ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. रिंकू चाहत्यांसाठी आपल्या विविध भूमिका घेऊन येत असते. सध्या लॉकडाऊनमुळे रिंकू आपल्या घरीच आहे. सध्या रिंकू अतिशय फिटनेस फ्रिक झाली आहे. ती सतत आपले फिटनेस फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. रिंकूमध्ये जबरदस्त बदल दिसून येत आहे. रिंकूच्या प्रत्येक पोस्टला चाहते खुपचं पसंत करतात. आणि तिला लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपलं प्रेमसुद्धा देतात.
(हे वाचा: VIDEO: 'मला म्हणत्यात हो पुण्याची मैना' 'अंजली' फेम अक्षयाचा पुणेरी ठसका)
अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ खरतर एक इन्स्टाग्राम रील आहे. यामध्ये रिंकू खुपचं सुंदर दिसत आहे. आणि त्यापेक्षाही सुंदर एक्सप्रेशन ती देत आहे. ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’ या सदाबहार गाण्यावर रिंकूने हा रील बनवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुपचं व्हायरल होतं आहे. रिंकूचे चाहते तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. आणि विविध कमेंट्स करून त्याच्या पोस्टला दाद देत आहेत.
(हे वाचा:दोषी आढळल्यास शिल्पा शेट्टीच्या पतीला होऊ शकते तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा )
रिंकूने ‘सैराट’ मधून चाहत्यांना वेड लावलं होतं. कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना या कालारांनी जबरदस्त अभिनय केला होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. इतकचं नव्हे तर 100 कोटी क्लबमध्ये समावेश होणारा ‘सैराट’ हा पाहिल्याचं चित्रपट होता. त्यामुळे रिंकूची आजही क्रेझ कायम आहे. तसं पाहायला गेलं तर आकाश ठोसर, तानाजी आणि अरबाज या सर्वच कालारांना अजूनही तसचं प्रेम मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.