• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रिंकू राजगुरूचा हा VIDEO पाहिला का? तुम्हीही पडाल प्रेमात

रिंकू राजगुरूचा हा VIDEO पाहिला का? तुम्हीही पडाल प्रेमात

‘सैराट’ (Sairat) मुळे एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru). रिंकू सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.

 • Share this:
  मुंबई, 19 मे : ‘सैराट’ (Sairat)  मुळे एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru). रिंकू सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ (Video)  आणि फोटो शेयर करत असते. चाहतेही तिला भरभरून प्रेम देत असतात. नुकताचं रिंकूने एक ‘ब्लॅक अँड व्हाईट’ व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती ‘आई ए मेहेरबा’ या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने आपल्या पहिल्याचं चित्रपटात अफाट यश संपादन केल आहे. सैराटमुळे ती प्रत्येकाची लाडकी झाली आहे. सध्या रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत आपले वेगवेगळे व्हिडीओ फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांही तिच्या पोस्टचं खुपचं खास असतात. त्यामुळे रिंकूच्या प्रत्येक पोस्टवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
  नुकताचं रिंकूने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. यामध्ये रिंकूने अगदी जुन्या हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री सारखा लुक केला आहे. आणि हातात छत्री घेऊन ‘आई ए मेहेरबा’ या गाण्यावर अभिनय करत आहे. जुन्या चित्रपटांचा टच देण्यासाठी हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट करण्यात आला आहे. (हे वाचा:PHOTO:तिरंगा हातात घेऊन भारतात परतली 'मिस यूनिवर्सची 3rd रनरअप' एडलिन कॅस्टिलिनो  ) या व्हिडीओमध्ये रिंकू खुपचं सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची सुद्धा मोठी पसंती मिळत आहे. रिंकूला सैराटने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. ती आजही ‘आर्ची’ या नावानेचं ओळखली जाते.  या चित्रपटानंतर रिंकूला चित्रपटांच्या अनेक ऑफर मिळाल्या होत्या. (हे वाचा: 'आम्ही प्रत्येक चित्रपटासाठी ऑडिशन देतो...',स्टार किड्सवर भडकली मल्लिका शेरावत  ) रिंकूने कागर, मेकअप, यांसारख्या चित्रपटात काम केल आहे. तर 100 या हिंदी वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलं आहे. तसंच रिंकूने सैराटच्या तमिळ वर्जनमध्ये सुद्धा काम केलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: