मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rinku Rajguru : 'मी म्हणत होते नको पण त्यांनी...' सैराटमधील 'त्या' सीनबाबत रिंकूचा मोठा खुलासा

Rinku Rajguru : 'मी म्हणत होते नको पण त्यांनी...' सैराटमधील 'त्या' सीनबाबत रिंकूचा मोठा खुलासा

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरू

सैराटमधील त्या सीनविषयी अभिनेत्री रिंकूनं मोठा खुलासा केला आहे. पाहा काय म्हणाली रिंकू.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 24 सप्टेंबर: झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात दर आठवड्याला नवीन महिला प्रवासी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अल्पावधीतच बस बाई बस हा कार्यक्रम प्रसिद्ध होतान दिसत आहे.  कार्यक्रमाची सुरुवातच महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला राजकारण्याच्या एंट्रीनं झाली होती. त्यानंतर एकाहून एक मराठमोळ्या अभिनेत्रींनी बस बाई बसच्या मंचावर हजेरी लावली आहे. या आठवड्यात सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू कार्यक्रमात प्रवासी म्हणून सहभागी झाली आहे. या वेळी कार्यक्रमाचा अँकर सुबोध भावेसह महिला प्रवाशांनी रिंकूला अनेक प्रश्न विचारते त्याची उत्तर रिंकूनं सर्वांबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट या सिनेमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. सिनेमात रिंकूनं साकारलेली आर्ची महाराष्ट्रानं डोक्यावर घेतली. आजही महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यात आर्ची ओळखली जाते सैराटमधील आर्चीचे फेमस डायलॉग, गाणी, आणि तिचे तगडे रांगडे शॉर्ट्स आजही प्रेक्षक आवडीनं पाहतात. त्यातील एक शॉर्ट पाहून सगळ्या तरूणी देखील आर्चीच्या प्रेमात पडल्या तो म्हणजे आर्चीचा विहिरीत उडू मारण्याचा सीन. या सीनचं खरं सत्य रिंकूनं यावेळी सांगतलं.

हेही वाचा - Rinku Rajguru च्या भावाला पाहिलंत का?; राखीच्या दिवशी शेअर केला खास PHOTO

बस बाई बसच्या मंचावरवरील महिला प्रवासांनी रिंकूला प्रश्न विचारला त्या म्हणाल्या, 'तुम्ही अशी विहिरीत उडी मारली की सगळ्या पोरींना तुमचं कौतुक वाटलं. तुम्हाला आधीच पोहता येत होत की तुम्ही तेव्हा शिकलात?'. या प्रश्नाचं उत्तर देत रिंकू म्हणाली, 'मला आधीपासूनच पोहायला येत होतं. मला माझ्या बाबांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पोहायला शिकवलं होतं. त्याचा उपयोग मला सैराटसाठी झाली. पण उडी मी पहिल्यांदाच मारली होती. तेव्हा मला फार भिती वाटली होती'.

रिंकू पुढे म्हणाली, 'शुटच्या वेळी मी खूप घाबरलेली आहे. मला उंचावरून उडी मारायला खूप भिती वाटत होती. मी त्यांना शुटींगच्या वेळी म्हणत होते की, मी नाही करत हा शॉर्ट. मी नकोच म्हणत होते. तेव्हा ते मला म्हणायचे, 'मारते की देऊ ढलकलून', मग मी थोडा वेळा घेऊन तो सीन केला.  आधी कधीच मी विहीरीत उडी मारलेली नव्हती.  पण पहिल्या 2 टेकमध्ये मी सीन कम्प्लिट केला होता.  पहिल्या वेळी चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं दुसऱ्या वेळी सीन पूर्ण केला'.

रिंकूचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial