आर्ची आणि परश्या पाकिस्तानलाही लावणार 'याड', 'सैराट' पाक फेस्टिवलमध्ये झळकणार

आर्ची आणि परश्या पाकिस्तानलाही लावणार 'याड', 'सैराट' पाक फेस्टिवलमध्ये झळकणार

पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये म्हणजेच पीफसाठी सैराटची निवड करण्यात आलीय.

  • Share this:

28 मार्च : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सिनेमाने राज्यासहित देशोदेशीच्या प्रेक्षकांना याड लावलं. आणि आता ते वेड लावायला जातोय पाकिस्तानात. आता हा सिनेमा पाकिस्तानमध्येही दाखवला जाणारे. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये म्हणजेच पीफसाठी सैराटची निवड करण्यात आलीय.

सैराटशिवाय या महोत्सवात नऊ भारतीय सिनेमे दाखवले जाणारेत. यात एसएस राजमौली यांचा बाहुबली टू द कनक्लूजन, डिअर जिंदगी, आओं देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, नील बाटे सन्नाटा आणि साँग्ज ऑफ स्कॉरपियंस हे सिनेमेही दाखवले जाणारेत.पाकिस्तानात भारतीय चित्रपटांना मागणी आहे. त्यांना भारतीय सिनेमे आवडतात.

आता पाकिस्तानी प्रेक्षकांनाही सैराट झिंगाट करून टाकतो का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

First published: March 28, 2018, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading