ज्याला करायचं होतं डेट, त्याची झाली भेट! रिंकू राजगुरूनं शेअर केला PHOTO

ज्याला करायचं होतं डेट, त्याची झाली भेट! रिंकू राजगुरूनं शेअर केला PHOTO

रिंकूनं काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : ‘सैराट’मधील आर्ची अर्थात मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरु नेहमीच काही ना काही कारणारनं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला रिंकूच्या ‘मेकअप’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘सैराट’ सिनेमानंतर आर्चीच्या लव्ह लाइफ बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र एरवी याबद्दल बोलणं टाळणाऱ्या रिंकूनं काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दल खुलासा केला होता. एवढंच नाही तर बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छाही बोलून दाखवली होती.

नुकतीच रिंकू आणि या अभिनेत्याची भेट झाली. हा अभिनेता आहे विकी कौशल आणि निमित्त होतं विकीच्या ‘भूत’ सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंगचं. य स्क्रिनिंगला रिंकूनं हजेरी लावली होती आणि त्यावेळचा एक फोटो सुद्धा तिनं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. रिंकूंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहे. काहींनी ‘अखेर तू त्याला भेटलीस’ असं म्हटलं आहे. तर एका चाहत्यानं ‘हेच यश असतं जेव्हा तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता’ अशी कमेंट केली आहे.

‘उद्या माझे ड्रायव्हर-मेकअपमन पण अवॉर्ड देतील’ सलमाननं सांगितलं बॉलिवूडचं सत्य

 

View this post on Instagram

 

Bhoot movie screening.#vickykaushal#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

काही दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीवरील ‘एकदम कडक’ या शोमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना आर्चीनं बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलला डेट करायची इच्छा बोलून दाखवली. या शोमध्ये आर्चीला एक दिवस डेट वर कोणासोबत जाऊ इच्छिते असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तिने विकी कौशलचं नाव घेतलं होतं आणि विकी कौशल का? तर तो मला फार आवडतो असं उत्तर तिनं दिलं होतं.

मलायकाशी घटस्फोटावर अरबाज म्हणतो, आमच्यात सर्वकाही ठिक होतं पण...

 

View this post on Instagram

 

A smile is the best makeup any girl can wear

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

याशिवाय काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीमधून तिनं तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दलही खुलासा केला. रिंकून काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरुन तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. तिनं Ask Me Anything च्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी एका चाहत्यानं तिला तुझा बॉयफ्रेंड आहे असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर रिंकूनं ‘नाही’ असं दिलं होतं.

लग्नाआधीच कृती सेनन आहे प्रेग्नन्ट? सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 11:27 AM IST

ताज्या बातम्या