Exclusive : 'सैराट 2'ची बातमी खोटीच, नागराजचा 'न्यूज18'कडे खुलासा

Exclusive : 'सैराट 2'ची बातमी खोटीच, नागराजचा 'न्यूज18'कडे खुलासा

सैराट तयार झाल्यावर त्याच्या दुसऱ्या भागाची कथा माझ्या मनात होती. पण मी 'सैराट 2' बनवेन की नाही माहीत नाही.

  • Share this:

मुंबई, 9 आॅक्टोबर :  दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाचं जादू अजूनही रसिकांच्या मनावर आहे. त्यात नागराजनं एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीचा विपर्यास केला गेला आणि 'सैराट 2' बनतोय या बातमीचं पेव फुटलं. म्हणून आम्ही थेट नागराज मंजुळे यांना गाठलं.

नागराज मंजुळे म्हणाले, ' मी कधीच सिनेमा बनवताना त्याचा सिक्वल बनेल, असा विचार करत नाही. सैराट तयार झाल्यावर त्याच्या दुसऱ्या भागाची कथा माझ्या मनात होती. पण मी 'सैराट 2' बनवेन की नाही माहीत नाही.' न्यूज18च्या वेबसाईटशी बोलताना नागराजनं स्पष्ट केलं. नागराज पुढे असंही म्हणाले की सैराट 2 बनावा ही लोकांची इच्छा आहे.

नागराज यांचं आता पूर्ण लक्ष त्यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाकडे आहे.  बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनना घेऊन नोव्हेंबरमध्ये शूटिंग सुरू होईल. ' सुरुवातीला अनेक पातळ्यांवरच्या अडचणी होत्या. पण हळूहळू त्या सुटत गेल्या आणि आता नागपूरला शूटिंग सुरू होईल.'

नागराज अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, ' ते नीट समजून घेतात. दुसऱ्याला आदर देतात. प्रेमानं सल्ला देतात. त्यांच्याबरोबर काम करताना छान वाटतं.'

बिग बी वगळता सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट नवखी आहे. नागराज यांनी सिनेमात काम करणाऱ्या मुलांना आधीच प्रशिक्षण दिलंय. नागपूरमध्ये शूटिंग सुरू होण्यापूर्वी ही मुलं काही काळ बिग बिनसोबत घालवतील. या सिनेमाची कथा उनाड मुलांना एकत्र करून त्यांची फुटबॉल टीम तयार करणाऱ्या प्रशिक्षकांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन फुटबाॅल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

छोटी मालकीण आणि छत्रीवाली देतायत यशस्वी स्त्री बनण्याच्या टिप्स

First published: October 9, 2018, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading