News18 Lokmat

पंतप्रधान मोदी आम्हाला मदत करा, सायरा बानोंचं आणखी एक टि्वट

समीर भोजवानी हा बिल्डर गेल्या काही दिवसांपासून वारंवार आम्हाला धमकी देत आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 11:35 PM IST

पंतप्रधान मोदी आम्हाला मदत करा, सायरा बानोंचं आणखी एक टि्वट

मुंबई, 18 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा टि्वट करून मदतीसाठी याचना केली आहे. या टि्वटमध्ये त्यांनी घराच्या जमिनीसाठी बिल्डर त्रास देतोय असं सांगितलं. तसंच मुख्यमंत्री फडणवीस हे फक्त आश्वासनं देत आहे अशी तक्रारही त्यांनी केली.

सायरा बानो यांनी टि्वट करून नरेंद्र मोदी यांना आपल्या घराची जागा ही समीर भोजवानी नावाचा बिल्डर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. तो आम्हाला वारंवार धमकी देतो असा आरोप बानो यांनी केला.सायरा बानो यांनी न्यूज18 कडे आपली व्यथा मांडली. समीर भोजवानी हा बिल्डर गेल्या काही दिवसांपासून वारंवार आम्हाला धमकी देत आहे. त्याने आम्हाला घर खाली करण्याची धमकी दिली असं बानो यांनी सांगितलं.

दिलीप कुमार यांच्या कुटुंबीय या घरात दिलीप कुमार यांच्या वस्तूचे संग्रालय बनवणार आहे. परंतु, जेलमध्ये सुटका झाल्यानंतर बाहेर आलेला बिल्डर समीर भोजवानीने या कामात अडथळा आणला.

Loading...

सायरा बानो यांनी दावा केला आहे की, दिलीप कुमार यांनी मुंबईतील वांद्रे इथं आपला बंगला 1953 साली खरेदी केला होता. या बंगल्याची सर्व कागदपत्रं आपल्याकडे आहे. परंतु, समीर भोजवानी हा या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे.

सायरा बानोने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबद्दल तक्रार केली होती. पंरतु, त्यांनी याबद्दल फक्त आश्वासनं दिली. आता सायरा बानो यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना टि्वट करून मदतीची याचना केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदींना टि्वट केलं होतं. या टि्वटरमध्ये, 'दिलीप कुमार यांचं पाली हिल आणि वांद्र्यात घर आहे. बिल्डर समीर भोजवानी या जागेला हडपण्याच्या प्रयत्नात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, समीर भोजवानी नुकताच जेलमधून सुटला आहे. याआधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी आश्वासन दिल्यानंतरही यात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पद्म विभूषण दिलीप कुमार यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणात मी तुम्हाला भेटू इच्छिते, कृपया मदत करा.' असं सायरा बानो यांनी म्हटलं होतं.

======================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 11:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...