करिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल सैफने शेअर केलं एक सिक्रेट; म्हणाला...

करिनाच्या प्रेग्नन्सीबद्दल सैफने शेअर केलं एक सिक्रेट; म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिच्या घरात लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. सध्या त्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान(Kareena Kapoor Khan) हिच्या घरात लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. लॉकडाऊनमध्ये करिनाने चाहत्यांना ही गोड बातमी देऊन धक्काच दिला होता. यानंतर चाहत्यांसह करिना आणि सैफ (Saif ali khan) याशिवाय तैमुरलाही नव्या पाहुण्याची प्रतीक्षा आहे. याबाबत सैफ अली खानने एक सिक्रेट शेअर केलं आहे. अभिनेत्री करिना कपूर खान फेब्रुवारी महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बाळाला जन्म देणार आहे. याबाबत सैफ अली खान याने सांगितलं की, करिना आणि तो नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहे. दुसऱ्या बाळाच्या माध्यमातून त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या येणार आहेत, त्या वेगळ्या असतील असं त्याने सांगितलं.

फिल्मफेअरसोबत बोलतना सैफने सांगितलं की, दुसरं बाळ फेब्रुवारी महिन्यात येणार आहे. सध्या सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. आम्हाला याचं अजिबातच टेंन्शन नाही. ते बाळ तैमूरबरोबर घरात खेळेल. मला याचा खूप आनंद आहे. करिना कपूर खानने जेव्हा तिच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं, त्यावर खूप वाद झाला होता. यंदा सैफ अली खान याने अद्याप बाळाच्या नावाचा विचार केलेला नाही. सैफने सांगितलं की बाळाच्या जन्मानंतरच मी आणि करिना बाळाचं नाव ठरवू.

हे ही वाचा-बॉलिवूडमध्ये लग्नसराई! श्रद्धा कपूरही चढणार बोहल्यावर? वडील शक्ती कपूर म्हणाले..

लिवूडची 'बेबो' अर्थातच करीना कपूर खान सध्या प्रेग्नन्सीचा काळ एन्जॉय करीत आहे. खरंतर सैफ अली खान तिची बरीच काळजी घेताना दिसत आहे. प्रेग्नंट असतानाही बेबो सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नन्सीचे फोटो समोर आले होते. आता सैफ अली खान आणि करीनाचे चाहते त्यांच्या छोट्या पाहुण्याची वाट पाहात आहेत. दरम्यान या स्टार जोडप्यासंबंधित एक जुना किस्सा मीडिया रिपोर्टमध्ये व्हायरल होत आहे.

हा किस्सा बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीशी संबंधित आहे. राणीने सैफला लग्नाच्या शुभेच्छा देताना एक खास सल्ला दिला होता. हा संबंधित सल्ला काय होता ? याचा खुलासा स्वत: सैफनं करिनासमोर केला आहे. काही दिवसांपूर्वी सैफ करीनाचा चॅट शो 'व्हॉट वुमन वान्ट्स' वर आला होता. यावेळी त्यांनी राणीने दिलेल्या सल्ल्याची आठवण करून दिली.

First published: January 28, 2021, 7:32 PM IST

ताज्या बातम्या