Home /News /entertainment /

सैफ अली खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून का झाली गायब? गंभीर आजाराने बोलूही शकत नव्हती, पाहा ती सध्या काय करतेय

सैफ अली खानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून का झाली गायब? गंभीर आजाराने बोलूही शकत नव्हती, पाहा ती सध्या काय करतेय

‘मैं खिलाडी तू अनाडी’ (Mai Khiladi Tu Anadi) या लोकप्रिय चित्रपटातील ती अभिनेत्री होती तसेच अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सोबत तिची जोडी विशेष लोकप्रिय ठरली होती.

  मुंबई 25 जुलै: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या पण काही काळातच बॉलिवूडमधून गायब झाल्या. काही स्वतःहून दूर झाल्या तर काही कारणांनी दूर गेल्या. त्यातीलच एक म्हणजे ‘मैं खिलाडी तू अनाडी’ (Mai Khiladi Tu Anadi) या लोकप्रिय चित्रपटातील अभिनेत्री. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सोबत तिची जोडी विशेष लोकप्रिय ठरली होती. रागेश्वरी लूम्बा (Rageshwari Loomba) असं या अभिनेत्रीच नाव आहे. अगदी बालपणापासूनच रागेश्वरी चित्रपट सृष्टीत सक्रिय होती. अनेक जाहिरातीत तिने काम केलं होतं. पण आता मात्र ती बॉलिवूड आणि सिनेसृष्टीपासून दूर आहे.

  'तिला बाहेर काढावचं लागेल' त्या अभिनेत्रीच्या अटकेनंतर हडबडली होती राज कुंद्राची टीम; Chats Viral

  रागेश्वरीला पॅरालीसिस (Paralysis) सारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागलं होतं. ज्यामुळे तिला बोलणही कठीण झालं होत. 28 वर्षांपूर्वी  रागेश्वरीने चंकी पांडे च्या आंखे या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं. पण 2000 साली  रागेश्वरीच्या शरीलाला लखवा मारला ज्याने ती गंभीररीत्या आजारी पडली होती.  तिची अवस्था इतकी बिकट झाली की तिच्या शरीराचा डावा भाग अजिबात हालचाल करू शकत नव्हती. रागेश्वरीने 2000 साली आपल्या वडिलांसोबत एक अल्बम लाँच केला होता. पण हा अल्बम प्रदर्शित झाल्याच्या 1 आठवड्यानंतर  रागेश्वरी आजारी पडली होती. दरम्यान हा अल्बम शुट करतानाच तिला मलेरिया झाला होता. आणि त्यातच तिला पॅरालिसीसचा अटॅक आला. तिला काहीही करण तसेच बोलणं ही शक्य नव्हतं. त्यानंतर जवळपास वर्षभर तिने पूर्णपणे फिजिओ थेरपी , योग , इलेक्ट्रिकल स्टीम्युलेशन या गोष्टींकडे लक्ष दिलं. त्यामुळे तिने लवकरच या अजारातून स्वतःला बाहेर काढलं. 2014 साली रागेश्वरीने लंडनला स्थाईक असणाऱ्या ह्यूमन राइट्स लॉयर सुधांशु स्वरुप याच्याशी विवाह केला. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिच्या लग्नाला हजेरी लावली होती. 2015 साली तिने एका मुलीला जन्म दिला. 44 वर्षीय रागेश्वरी आता लंडनला स्थाईक झाली आहे. तर आपल्या मुलीसोबत आणि पतीसोबत ती वेळ घालवत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Saif Ali Khan

  पुढील बातम्या