सैफला त्याचा मुलगा इब्राहिम म्हणाला 'म्हातारा', फॅन्सची रिअॅक्शन पाहाच
सैफला त्याचा मुलगा इब्राहिम म्हणाला 'म्हातारा', फॅन्सची रिअॅक्शन पाहाच
सारा आतापर्यंत आई अमृता सिंग आणि इब्राहिमसोबत राहत होती. आता तिनं नवं घर घेतलंय.
आजही अनेक तरूणींचा क्रश असलेल्या सैफ अली खानला त्याच्याच मुलाने 'Old Man' म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांनी इब्राहिमच्या या कॅप्शनबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई, 09 मार्च : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह (Amruta Singh) यांचा मुलगा इब्राहिम खान (Ibrahim Ali Khan) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. नुकताच बहिण सारा अली खान (Sara Ali Khan) त्याच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले होते. भावाबरोबर बिकीनीतील फोटो शेअर केल्यामुळे सारा अली खान खूप ट्रोल झाली होती. इब्राहिम सुद्धा सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत असतो. सध्या त्याने वडील सैफ अली खानबरोबर एक फोटो शेअर केला आहे. एखाद्या पार्टीमधील हा फोटो आहे. या फोटोपेक्षा इब्राहिमने या फोटोला दिलेली कॅप्शन जास्त रंजक आहे. हा फोटो शेअर करताना इब्राहिम म्हणाला आहे की 'मी आणि ओल्ड मॅन'. आजही अनेक तरूणींचा क्रश असलेल्या सैफ अली खानला त्याच्याच मुलाने 'Old Man' म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांनी इब्राहिमच्या या कॅप्शनबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 'सैफ अजिबात old man नाही आहे', 'सैफ जास्त हॉट आहे', अशा प्रतिक्रिया तरूणींनी दिल्या आहेत.
इब्राहिम सोशल मीडियावर नेहमी फोटो पोस्ट करत असतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्याने त्याची आई अमृता सिंहबरोबरचा देखील फोटो पोस्ट केला होता. त्याच्या लहानपणीच्या या फोटोमध्ये देखील इब्राहिम खूप Cute दिसत आहे.
बहिण सारा अली खान बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवत असताना इब्राहिमने मात्र त्याच्या करिअरसंदर्भात कोणता खुलासा केला नाही आहे. मात्र तो क्रिकेट खेळाकडे जास्त लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे येत्या काळात इब्राहिम वडील सैफ अली खानची परंपरा सुरू ठेवणार की आजोब मन्सूल अली खान पतौडी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मैदान गाजवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.